शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईत चमकदार कामगिरी

By admin | Updated: May 29, 2016 02:30 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

जान्हवी विदर्भात अव्वल : यवतमाळ पब्लिक स्कूलची १०० टक्के यशाची परंपरा कायम यवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यवतमाळातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी यात चमकदार कामगिरी केली. यवतमाळ पब्लिक स्कूलने १०० टक्के निकाल देत यशाची परंपरा कायम ठेवली तर स्कूल आॅफ स्कॉलर्स आणि केंद्रीय विद्यालयाचाही १०० टक्के निकाल लागला आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलच्या जान्हवी जयप्रकाश राठी हिने विदर्भात अव्वल स्थान पटकाविले आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशाने यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलने गत सात वर्षांपासून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जान्हवी जयप्रकाश राठी हिने ९९.०६ टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल स्थान पटकाविले. तर याच स्कूलचा विद्यार्थी सौरभ प्रदीप ठोकाडे आणि वेदांत लक्ष्मीकांत देशपांडे यांना ९९ टक्के गुण मिळाले आहे. तर आदित्य अंबाडकर आणि चैतन्य चावक या दोघांना ९८.०८ टक्के गुण मिळाले आहे. वायपीएसचे दहावीच्या परीक्षेला १२७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले आहे. वायपीएसच्या १५ विद्यार्थ्यांना विविध विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. स्कूल आॅफ स्कॉलर्स यवतमाळ येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या १६४ विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीची परीक्षा दिली. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३७ विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्यावर गुण घेतले. लुम्बिनी फुलझेले ही ९७.२ टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली. वेदांत राठोड याने ९७ टक्के गुण घेत द्वितीय स्थान मिळविले. अमन झांबड व खुशी भारती यांनी प्रत्येकी ९५.८ टक्के गुण घेत तृतीय स्थानी राहिले. पारूल डंभारे व ऋतुजा सातपुते यांनी प्रत्येकी ९५.२ टक्के गुण प्राप्त करत चौथे स्थान मिळविले. अथर्व कोकाटे हा ९४.८ टक्के गुण घेत पाचव्या स्थानी राहिला.यवतमाळ येथील केंद्रीय विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्यावर गुण घेतले आहे. श्रृती शरद घारोड, गायत्री कैलास उईके, अनुराग प्रधान, नचिकेत राठोड, सर्वेश पवार हे विद्यार्थी ९५ टक्केच्यावर गुण घेत यशस्वी झाले आहेत. यवतमाळ येथील सेंट अलॉयसिअसची विद्यार्थिनी साक्षी सुधीर वानखडे ही ९८ टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली आहे. सीबीएसई बोर्डात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून गुणवंत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. (शहर वार्ताहर)