देशी कट्ट्यासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:34 IST2018-07-29T23:34:05+5:302018-07-29T23:34:52+5:30
स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मंडीत एका टीनाच्या शेडखाली बसलेल्या दोघांना गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याजवळून देशी कट्टा व एक काडतुस जप्त करण्यात आले.

देशी कट्ट्यासह दोघांना अटक
ठळक मुद्देकाडतूसही हस्तगत : यवतमाळच्या भाजीमंडीत एलसीबीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मंडीत एका टीनाच्या शेडखाली बसलेल्या दोघांना गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याजवळून देशी कट्टा व एक काडतुस जप्त करण्यात आले.
अनिकेत प्रदीप वैद्य (२०) रा.आंबेडकरनगर, भूषण दादाराव साखरे (२५) रा.अशोकनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई एसपी एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक उमेश नासरे, एएसआय ओमप्रकाश यादव, जमादार गजानन धात्रक, बंडू डांगे, किरण पडघण, नीलेश घुसे, सुरेंद्र वाकोडे यांनी केली.