शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड मतदारसंघावर भाजपाचा दावा कायम

By admin | Updated: August 23, 2014 02:11 IST

उमरखेड विधानसभा मतदारसंघ रिपाइं (आठवले) गटासाठी सोडावा म्हणून जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्या दृष्टीने रिपाइंचे नेते व संभाव्य उमेदवार तयारीलाही लागले आहे.

अविनाश खंदारे उमरखेड (कुपटी)उमरखेड विधानसभा मतदारसंघ रिपाइं (आठवले) गटासाठी सोडावा म्हणून जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्या दृष्टीने रिपाइंचे नेते व संभाव्य उमेदवार तयारीलाही लागले आहे. मात्र भाजपाच्या पश्चिम विदर्भ संघटन मंत्र्यांनी येथे प्रमुख दावेदार व पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतल्याने या मतदारसंघावर भाजपाचा दावा कायम असल्याचे संकेत मिळत आहे. उमरखेड मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. विजय खडसे येथील आमदार आहेत. परंतु त्यांच्या विरोधात मतदार, पक्षातील इतर गट, आघाडीतील सहकारी पक्ष आणि जनतेमध्येसुद्धा प्रचंड नाराजी आहे. ते पाहून विरोधी पक्ष सक्रिय झाला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले यांनीसुद्धा उमरखेड मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यासाठी दिग्रसमधून उमेदवार आयात करण्याचीही तयारी आहे. याशिवाय आणखी काही नावे चर्चेत आहेत. मोदी लाट आणि लोकसभेतील यशामुळे भाजपाचा जोर वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार विजय खडसे धास्तावले आहे. हा मतदारसंघ रिपाइंला सुटावा म्हणून त्यांचीही सुप्त इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत प्रयत्न चालविल्याची चर्चाही काँग्रेसच्या गोटात आहे. एकीकडे रिपाइं उमरखेड मतदारसंघावर दावा करीत असताना भाजपानेही आपला दावा कायम असल्याचे दाखविण्याची एकही कसर सोडलेली नाही. भाजपाचे संघटन मंत्री रामदास अंबरकर यांनी नुकताच उमरखेड मतदारसंघाचा दौरा केला. १९ आॅगस्टला त्यांनी शासकीय विश्रामभवनावर भाजपाचे संभाव्य उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली, मते जाणून घेतली. भाजपाचा उमेदवार कुणीही राहो, सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आदेश त्यांनी दिले. मात्र त्यांचे हे आदेश दोन दावेदारांना मान्य नसल्याचे त्यांच्या बहिर्गमनावरून दिसून आले. यावेळी दावेदारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. या सर्व घडामोडींवरून उमरखेडची जागा भाजपाच लढविणार असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहे. मात्र अखेरच्या क्षणी नेत्यांच्या वाटाघाटीत अचानक पक्षीय दावेदारीत फेरबदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.