शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ग्राहक मंचचा दणका

By admin | Updated: October 9, 2014 23:10 IST

येथील पंजाब चिकटे यांना महावितरणचे कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी वीज देयकप्रकरणी त्रास दिल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दोन्ही अभियंत्यांनी चिकटे यांना

नांदेपेरा : येथील पंजाब चिकटे यांना महावितरणचे कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी वीज देयकप्रकरणी त्रास दिल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दोन्ही अभियंत्यांनी चिकटे यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे़येथील पंजाब चिकटे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत न्याय मंचात संबंधित अभियंत्याविरूध्द तक्रार दाखल केली होती़ मार्च २०१२ पासून सप्टेंबर २०१३ पर्यंत त्यांना सरासरी युनिटचे देयक देण्यात आले होते. ते चिकटे यांनी भरले़ सदरचे देयक जास्त असल्याने त्यांनी मीटर बदलवून देण्याबाबत महावितरणकडे अनेकदा अर्ज केले होते. मे २०१२, डिसेंबर २०१२, नोव्हेंबर २०१३ रोजी त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दिले़ दरम्यान १५ फेब्रुवारी २०१२ पासून आॅक्टोबर २०१३ पर्यंत त्यांना २० महिन्यांचे दोन हजार ६१५ युनिटचे देयक पाठविण्यात आले. त्यापैकी चिकटे यांनी सप्टेंबर २०१३ पर्यंत एक हजार १९० युनिटचे देयक भरले़ ग्राहकाचा वीज वापर अतिशय मर्यादीत आहे. त्यांच्या वापरानुसार त्यांना प्रतिमाह १४़२५ युनिटचे देयक मिळणे गरजेचे होते. मात्र देयक जादा येत होते.या जादा वीज देयकाबाबत त्यांनी जादा अदा केलेली रक्कम पाच हजार रूपये आहे, असा त्यांचा दावा होता. संबंधित दोन्ही अभियंत्यांनी चिकटे यांना वीज देयकापोटी अतिरिक्त रक्कम घेतली. ही अतिरिक्त रक्कम महावितरणकडे जमा झाली असेल, तर ती पुढील देयकात समायोजित करून घ्यावी व त्या संबंधीचा अहवाल ग्राहक न्याय मंचाकडे द्यावा, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. तसेच चिकटे यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल संबंधित अभियंत्यांनी पाच हजार रूपये, तक्रारीचा खर्च रूपये दोन हजार रूपये, देण्याचे आदेशही जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिले आहे. हे आदेश संबंधित ग्राहकाला प्राप्त झाले आहे. आता महावितरणने कारवाई न केल्यास ते अपिलात जाणार आहे. (वार्ताहर)