बँक ग्राहकाचे पावणे तीन लाख उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:44+5:30

होम लोन खात्याचे पैसे जमा झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. कस्टमर केअरमधून बोलणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीने विशालशी दीर्घ चर्चा करत त्याला ‘एनी डेस्क’ नावाचा अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर त्या व्यक्तीने विशालकडून त्याचा मोबाईल नंबर घेतला.

The bank blew up three lakh of the customer's pawns | बँक ग्राहकाचे पावणे तीन लाख उडविले

बँक ग्राहकाचे पावणे तीन लाख उडविले

Next
ठळक मुद्दे‘अ‍ॅप डाऊनलोड’चा फटका। ‘कस्टमर केअर’कडे चौकशी करणे पडले महागात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गृहकर्जाचे पैसे जमा झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या ग्राहकाने कस्टमर केअरला कॉल केला. या कॉलवरून त्या ग्राहकाला संबंधित व्यक्तीने पावणे तीन लाखांचा गंडा घातला. कस्टमर केअरच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये ‘एनी डेस्क’ नावाचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून गंडविले.
विशाल धनराज गावंडे (३८) रा.चिंतामणीनगर, वैभवनगरजवळ वाघापूर असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. विशालने होम लोन घेतले होते. होम लोन खात्याचे पैसे जमा झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. कस्टमर केअरमधून बोलणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीने विशालशी दीर्घ चर्चा करत त्याला ‘एनी डेस्क’ नावाचा अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर त्या व्यक्तीने विशालकडून त्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्याने एफडीची रक्कम कस्टमर आयडीचा वापर करीत चालू खात्यात वळती केली. त्यानंतर चालू बँक खात्यातून परस्पर दोन लाख ७१ हजारांची रक्कम काढून घेतली. हा प्रकार २६ मे ते २८ मे दरम्यान घडला. बँक खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यानंतर विशालने लोहारा पोलीस ठाणे गाठले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्याने पोलिसांकडे ही माहिती दिली. लोहारा ठाण्यात गुन्हा नोंदविला.

बँकेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्न
फिक्स डिपॉझिटची रक्कम ही ठराविक काळासाठी सुरक्षित असते. त्या रकमेचा चालू बँक खात्याशी थेट संबंध येत नाही, असे असतानाही परस्पर ऑनलाईन पद्धतीने एफडीतील रक्कम बँक खात्यात वळती झालीच कशी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बँकेच्या एफडी सुरक्षा प्रणालीवर संशय व्यक्त होत आहे.

पोलीस निरीक्षक करणार तपास
लोहारा येथे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लुले ठाणेदार आहे. ऑनलाईन फसवणूक व आयटी अ‍ॅक्टच्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला जातो. त्यामुळे हा गुन्हासुद्धा वर्ग केला जाणार आहे.

Web Title: The bank blew up three lakh of the customer's pawns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.