शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छाग्रहींकडून ग्रामीण भागात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व वाढत आहे़ गट विकास अधिकारी पी. एम. मडावी व तालुका वैद्यकीय अधिकारी संजय मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांना वेग देण्यात येत आहे़ यात ग्रामीण भागासाठी अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे़

ठळक मुद्देवैयक्तिक स्वच्छतेचे महत्व वाढले : गावागावांत केले जात आहे औषधांद्वारे निर्जंतुकीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पांढरकवडा पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात आली आहे़ ग्रामीणस्तरावर हे स्वच्छाग्रही हात स्वच्छ कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक करुन दाखवत जाणीव जागृती करत आहेत़यातून ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व वाढत आहे़ गट विकास अधिकारी पी. एम. मडावी व तालुका वैद्यकीय अधिकारी संजय मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांना वेग देण्यात येत आहे़ यात ग्रामीण भागासाठी अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे़ याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत औषध फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वच्छाग्रही यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मास्क लावणे, हात धुणे, तोंडाला, नाकाला रुमाल बांधणे, सामाजिक अंतर राखणे याविषयी जाणीव जागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतस्तरावर कोरोना हद्दपार करण्यासाठी स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेणेबाबत राज्यस्तरावरून सूचना प्राप्त होत्या. त्यानुसार गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छाग्रहींना या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेऊन गावांत काम करण्याचे प्रशिक्षण दिले होते़. त्यानुसार स्वच्छाग्रहींनी ग्रामीण भागात काम सुरु केले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या