स्वच्छाग्रहींकडून ग्रामीण भागात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:39+5:30

ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व वाढत आहे़ गट विकास अधिकारी पी. एम. मडावी व तालुका वैद्यकीय अधिकारी संजय मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांना वेग देण्यात येत आहे़ यात ग्रामीण भागासाठी अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे़

Awareness in rural areas from Sweeper | स्वच्छाग्रहींकडून ग्रामीण भागात जनजागृती

स्वच्छाग्रहींकडून ग्रामीण भागात जनजागृती

ठळक मुद्देवैयक्तिक स्वच्छतेचे महत्व वाढले : गावागावांत केले जात आहे औषधांद्वारे निर्जंतुकीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पांढरकवडा पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात आली आहे़ ग्रामीणस्तरावर हे स्वच्छाग्रही हात स्वच्छ कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक करुन दाखवत जाणीव जागृती करत आहेत़
यातून ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व वाढत आहे़ गट विकास अधिकारी पी. एम. मडावी व तालुका वैद्यकीय अधिकारी संजय मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांना वेग देण्यात येत आहे़ यात ग्रामीण भागासाठी अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे़ याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत औषध फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वच्छाग्रही यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मास्क लावणे, हात धुणे, तोंडाला, नाकाला रुमाल बांधणे, सामाजिक अंतर राखणे याविषयी जाणीव जागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतस्तरावर कोरोना हद्दपार करण्यासाठी स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेणेबाबत राज्यस्तरावरून सूचना प्राप्त होत्या. त्यानुसार गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छाग्रहींना या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेऊन गावांत काम करण्याचे प्रशिक्षण दिले होते़. त्यानुसार स्वच्छाग्रहींनी ग्रामीण भागात काम सुरु केले आहे़

Web Title: Awareness in rural areas from Sweeper