शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियाकडून पोलीस पाटलाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST

आरिफ मलनस (४२) रा.महागाव असे या घटनेतील प्रमुख आरोपीचे नाव आहे. सावंगी परिसरातून रेतीमाफिया मागील चार महिन्यांपासून उत्खनन करत आहे. अवैध काम असूनही गावकऱ्यांनी हरकत घेतली नाही. आता पावसाळा असल्याने शेतातील रस्त्याचे रेतीच्या वाहनामुळे नुकसान होत आहे. शिवाय या रस्त्यावरून पुराचे पाणी गावात येत असल्याने पिण्याच्या हातपंपाचे पाणी दूषित होत आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील थरार : अडाण नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा तालुक्यातील वडगाव(गाढवे) परिसरातील अडाण नदीपात्रातून अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे. यामुळे शेतातील रस्त्यांचे नुकसान होत आहे. शिवाय दूषित पाणी गावात येत असल्याने पाणवठे दूषित होत आहे. यामुळे उत्खननाला मज्जाव केल्याने रेतीमाफियाने सोमवारी चक्क सावंगी येथील पोलीस पाटलाच्या खुनाचा प्रयत्न केला.आरिफ मलनस (४२) रा.महागाव असे या घटनेतील प्रमुख आरोपीचे नाव आहे. सावंगी परिसरातून रेतीमाफिया मागील चार महिन्यांपासून उत्खनन करत आहे. अवैध काम असूनही गावकऱ्यांनी हरकत घेतली नाही. आता पावसाळा असल्याने शेतातील रस्त्याचे रेतीच्या वाहनामुळे नुकसान होत आहे. शिवाय या रस्त्यावरून पुराचे पाणी गावात येत असल्याने पिण्याच्या हातपंपाचे पाणी दूषित होत आहे. हा धोका ओळखून गावचे पोलीस पाटील प्रकाश जाधव यांनी रेतीमाफियांना उत्खनन करू नये, असे सांगितले. यावरून चिडलेल्या आरिफ मलनस याने आपल्या तीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस पाटील प्रकाश जाधव यांच्यावर तलवार, लोखंडी रॉड व चाकूने हल्ला चढविला. हा हल्ला प्रकाश जाधव यांच्या घरासमोरच माफियांनी केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तारांबळ उडाली. जाधव यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य व गावकरी धावून आले. हल्लेखोर पळाल्याने प्रकाश जाधव यांचा जीव वाचला. त्यांना गंभीर दुखापत असल्याने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. ठाणेदार विनय कारेगावकर यांनी आरिफ मलनससह तिघांना ताब्यात घेतले आहे.रेती माफियांचा उपद्रव, गुन्हेगारांचा शिरकावगावखेड्यात रेतीमाफियांचा उपद्रव वाढला असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे रेतीच्या व्यवसायात उतरले आहे. जिल्ह्यात अनेक रेती घाटावरून राजरोसपणे उत्खनन सुरू आहे. पोलीस व महसूल यंत्रणा ठोस कारवाई करत नसल्याने रेतीमाफिया निर्ढावले आहेत. यातून अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :Murderखून