शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:40 IST

दिसले अंतराळस्थानक : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतण्याची उत्सुकता

विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मंगळवारची सायंकाळ खगोलप्रेमींसाठी विशेष ठरली. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक (आयएसएस) पाहण्याची अनोखी संधी विदर्भवासीयांना मिळाली. सायंकाळी ७:१२:५९ वाजता पश्चिम दिशेच्या डाव्या बाजूने या स्थानकाने विदर्भाच्या अवकाशात प्रवेश केला आणि ७:१९:१० वाजताच्या सुमारास उत्तर दिशेच्या उजवीकडून ते पुढे वेगाने निघून गेले. जाताना हे अवकाशस्थानक पांढऱ्या बिंदूप्रमाणे चमकताना दिसले. विशेष म्हणजे भारतीय वंशाची अमेरिकन शास्त्रज्ञ अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या परतीची प्रक्रिया बुधवार, १२ मार्चपासून सुरू होणार असल्याने विदर्भाच्या आकाशातून प्रवास करण्याची विल्यम्स यांची ही बहुधा शेवटची फेरी असेल. कोणत्याही दुर्बिणीशिवाय आपल्या घराच्या गच्चीतून थेट आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक पाहण्याचा योग विदर्भवासीयांना यानिमित्ताने अनुभवता आला. या अवकाशस्थानकात भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर अडकून पडले आहेत.

अनेक ठिकाणांहून दिसले स्थानकमंगळवारी सायंकाळी ०७:०० वाजून १२ मिनिटांनी यवतमाळ येथून हे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक आकाशात दिसले. ०७:०० वाजून १९ मिनिटांपर्यंत यवतमाळकरांसह २०० कि.मी. परिसरातील नागरिकांना ते पाहता आले. याबरोबरच वर्धा, वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, तसेच भंडारा आदी जिल्ह्यांतील खगोलप्रेमींनीही हे स्थानक पाहण्याचा अनुभव घेतला. येथून पुढच्या प्रवासात सुनीता विल्यम्स या स्थानकात नसतील. मात्र, नव्याने आलेल्या नासाच्या सहकाऱ्यांसोबत या स्थानकाचा प्रवास सुरू राहील.

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतण्याची उत्सुकतागतवर्षी जून महिन्यात ८ दिवसांच्या मोहिमेसाठी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात गेले होते; परंतु तांत्रिक समस्येमुळे ते अंतराळस्थानकावरच अडकून पडले. त्यांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न 'नासा'कडून सुरू होते. आता ही प्रतीक्षा संपणार आहे. स्पेस एक्सचे कू १० मिशन बुधवार, दि.१२ मार्च रोजी प्रक्षेपित होईल. त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळवीरांची जागा नासाचे दुसरे अंतराळवीर घेऊन विल्यम्स आणि विल्मोर हे दोघे परततील. नवे सहकारी आयएसएसवर सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी राहणार असल्याचे नासाने म्हटले आहे.

"प्रत्येकवेळी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक वरून जाताना पाहण्यासाठी अचूक वेळ मिळणे आवश्यक असते. त्यातच यावेळी सायंकाळची वेळ असल्याने यवतमाळकरांना हा क्षण अनुभवता आला. या स्थानकाची पृष्ठभागापासूनची उंची ४२१ कि.मी. तर गती ७.६६ कि.मी. प्रतिसेकंद इतकी असावी, हे अवकाशस्थानक यवतमाळ शहराभोवतालच्या २०० कि.मी. परिसरातून दुर्बिणीशिवाय साध्या डोळ्याने दिसले."- रवींद्र खराबे, खगोल अभ्यासक

टॅग्स :Vidarbhaविदर्भYavatmalयवतमाळSunita Williamsसुनीता विल्यम्सNASAनासा