शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात युरिया, खताची कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देतात. खताच्या किंमतीबाबत शेतकऱ्याने वाद घातला, तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगून शेतकऱ्यांना आल्यापावली परत पाठवतात.

ठळक मुद्देचढ्या दराने विक्री : कृषी केंद्रांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : खरीप हंगामासाठी शेतकरी विविध रासायनिक खतांची खरेदी करीत असताना गत काही दिवसांपासून तालुक्यात युरिया व खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे काही विक्रेते चढ्या दराने खताची विक्री करीत आहे. याबाबत कृषी विभागाने लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पांढरकवडा तालुक्यात अनेक शेतकरी खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी पीक घेतात. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही प्रमुख पिकांची ५२ हजार ५३७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.तालुक्यात यंदाही कपाशी आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांचे अधिक लक्ष्य आहे. आता पिके वाढीवर असून त्यामुळे शेतकºयांना युरियाची अतिशय आवश्यकता आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जावून युरियाबाबत विचारणा करतात. परंतु युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देतात.खताच्या किंमतीबाबत शेतकऱ्याने वाद घातला, तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगून शेतकऱ्यांना आल्यापावली परत पाठवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव चढ्या दरात युरिया खरेदी करावी लागत आहे. प्रत्येक हंगामातच कृषी विक्रेते युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर त्याची चढ्या भावाने विक्री करतात. यातून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुट होत आहे.कृषी केंद्रचालक करतात खताचे लिंकिंगयुरिया विकत घेताना कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना इतर खते किंवा किटकनाशक विकत घेण्याची सक्ती करतात. इतर खते अथवा किटकनाशक खरेदी केले, तरच युरिया देतात. शेतकऱ्यांना केवळ युरियाची गरज असते. मात्र नाईलाजाने शेतकऱ्यांना युरियासोबत इतर उत्पादन विकत घ्यावे लागते. कृषी केंद्रचालकांच्या या लिंकींगवर कुणाचाही अंकुश नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती