पुसदमध्ये देशी कट्ट्यासह आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:11 IST2019-09-17T01:11:15+5:302019-09-17T01:11:43+5:30
शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना संशयित आरोपी आढळून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ देशीकट्टा व चार जीवंत काडतूस मिळाले. ही कारवाई रविवारी रात्री दरम्यान करण्यात आली.

पुसदमध्ये देशी कट्ट्यासह आरोपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना संशयित आरोपी आढळून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ देशीकट्टा व चार जीवंत काडतूस मिळाले. ही कारवाई रविवारी रात्री दरम्यान करण्यात आली.
समीर खान असदम खान (२५) रा. हमीदिया मशिद वसंतनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके पथकासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, वसंतनगर परिसरातील हॉटेल जमजम मागे समीर खान हा अग्नीशस्त्र घेऊन फिरत आहे. यावरुन पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात फौजदार नीलेश शेळके, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, मो.ताज, नागेश वास्टर यांनी केली.