शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

आर्णीच्या गजाननची डॉक्टरकीसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 9:36 PM

येथील सामान्य कुटुंबातील गजाननची डॉक्टरकीसाठी धडपड सुरू आहे. मात्र कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने त्याचे स्वप्न अर्ध्यावरच थांबले. गजानन हा येथील सामान्य नाभिक कुटुंबातील युवक.

ठळक मुद्देआर्थिक अडचण : नैराश्यामुळे शिक्षण अर्ध्यावरच थांबले

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील सामान्य कुटुंबातील गजाननची डॉक्टरकीसाठी धडपड सुरू आहे. मात्र कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने त्याचे स्वप्न अर्ध्यावरच थांबले.गजानन हा येथील सामान्य नाभिक कुटुंबातील युवक. २०१७ मध्ये बारावीत चांगले गुण घेतल्याने त्याची गुणवत्तेच्या आधारावर डेन्टीस्ट (दंत चिकित्सक) अभ्यासक्रमासाठी नागपूर येथील डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमध्ये निवड झाली. त्याच्या वडिलांचे आर्णीत छोटेसे सलून आहे. त्यावरच ते कुटुंबाचा गाडा हाकतात. त्यामुळे गजाननचा शिक्षण खर्च कसा पेलायचा, अशी त्यांना चिंता पडली. त्यांनी घर गहाण ठेवून कर्ज घेतले. गजाननचे शुल्क भरून त्याला डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी रवाना केले. मात्र इकडे भाड्याच्या दुकानाचे मालक बदलले. दुकान दुसऱ्या मालकाने घेतल्याने त्यांना सलून बंद करावे लागले. यामुळे आर्थिक घडी विस्कटली.काही महिन्यानंतर पुन्हा तेच दुकान भाड्याने घेतले. मात्र आर्थिक घडी बसविणे कठीण झाले. गजाननला वेळेत पैसे पोहोचणे अवघड झाले. वडिलांनी ही स्थिती मुलाला कळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांची घुसमट गजाननच्या लक्षात आली. यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याची अस्वस्थता नैराश्येत बदलली. शिक्षण अर्ध्यावर सोडून गजानन गावी परतला.गजाननची घुसमट अनेकांच्या लक्षात आली. वडिलांच्या एका मित्राने त्याला बोलते केले. त्याला नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला यवतमाळच्या मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. अखेर गजानन नैराश्यतेतून बाहेर आला. आता त्याला पुन्हा उमेदीने उभे होऊन दंत चिकित्सक व्हायचे आहे. यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील संवेदनशील व दातृत्वशील लोकांनी समोर येऊन त्याला मदत करण्याची गरज आहे. मदतीचे हात पुढे सरसावल्यास एका गरीब मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.पैशापुढे गुणवत्ता फिकीगजानन गुणवत्तेवर डॉक्टरकीसाठी निवडला गेला. मात्र कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्याची गुणवत्ता फिकी ठरली. वडिलांच्या तगमगीने त्याला नैराश्यतेत लोटले. परिस्थितीपुढे नमलेल्या गजाननने पुन्हा उभारी घेतली. मात्र आर्थिक अडचण कायम आहे. त्याच्या शिक्षणाचा खर्च वडील पेलू शकत नाही. त्यामुळे या गुणी युवकाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न कोमेजणार तर नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरStudentविद्यार्थी