झेडपी पाणीपुरवठा विभागात मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:08+5:30

विभागात काही अधिकारी आपल्या मर्जीनुसार मर्जीतील कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा टेबल देण्यासाठी प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या एका कर्मचाऱ्याला नुकताच टेबल देण्यात आला. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यालाही टेबल देण्यात आला.

Arbitrary in the ZP water supply section | झेडपी पाणीपुरवठा विभागात मनमानी

झेडपी पाणीपुरवठा विभागात मनमानी

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचारी अस्वस्थ : इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा येण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेचापाणीपुरवठा विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. आता कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनेवरून त्या विभागात मनमानी सुरू असल्याची ओरड होत आहे.
आतापर्यंत हा विभाग प्रभारी कार्यकारी अभियंत्याच्या अखत्यारित होता. नुकतेच या विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंते लाभले आहे. यापूर्वी हा विभाग सतत चर्चेत होता. विभागात काही अधिकारी आपल्या मर्जीनुसार मर्जीतील कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा टेबल देण्यासाठी प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे पदोन्नती झालेल्या एका कर्मचाऱ्याला नुकताच टेबल देण्यात आला. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यालाही टेबल देण्यात आला. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्याला आर्थिक विषयकबाबींचा टेबल देवू नये असा स्पष्ट उल्लेख आपल्या आदेशात केला होता. मात्र आदेशाला डावलून त्याला टेबल दिल्याची चर्चा आहे.
या विभागात काही अधिकारी, कर्मचारी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसले आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे सतत वाद होत असल्याची चर्चा आहे. काही कर्मचारी केवळ लावालावी करण्यात गुंग असतात. यामुळेच गेल्या तीन वर्षांपासून या विभागात लिपीकवर्गीय पदे रिक्त असूनही अनेक कर्मचारी येण्यास नकार देतात. या विभागाचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातही चर्चेचा विषय ठरला आहे.

सीईओंच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली. कुणावरही अन्याय केला नाही.
- प्रदीप कोल्हे
कार्यकारी अभियंता,
पाणीपुरवठा विभाग

Web Title: Arbitrary in the ZP water supply section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.