शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिका लिहावी नेटकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नंतर प्रत्येक पानागणिक बेढब होत जातो. त्यामुळे लिखाणाची गती शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला. बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना होते.

ठळक मुद्देदिवस परीक्षेचे : तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले उत्तरपत्रिका लिहिण्याचे सोपे उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बारावीच्या परीक्षा आता संपत आल्या असून दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो, पण दहावीचे विद्यार्थी ‘बोर्ड’ या नावानेच अर्धे घाबरलेले असतात. त्यामुळेच मुलांची बोर्डाची भीती दूर व्हावी आणि उत्तम पद्धतीने उत्तरे लिहिता यावी म्हणून ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ असा सल्ला ‘लोकमत’च्या माध्यमातून तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांनी दिला.दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नंतर प्रत्येक पानागणिक बेढब होत जातो. त्यामुळे लिखाणाची गती शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला.बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना होते. काही मोजक्या उत्तरपत्रिका सोडल्या तर उर्वरित उत्तरपत्रिकांमध्ये लिखाणातील सुसूत्रता, वळणदार अक्षरे, सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे लेखनकौशल्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे.उत्तरपत्रिका लिखाणाचे काही नियम, विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरजआजपासून विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षाराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा मंगळवार ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यंदा जिल्ह्यातील ४४ हजार १७० विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहे. १५६ केंद्रांवर शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. शिक्षण विभागाचे ५ आणि डायटचे १ भरारी पथक कॉपीमुक्त परीक्षेसाठी लक्ष ठेवणार आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवरील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.उत्तरपत्रिका हाती येताच पहिल्यांदा संपूर्ण उत्तरपत्रिका पाहून घ्यावी. अनेकदा उत्तरपत्रिकेचे धागे निसटलेले असतात. अशी उत्तरपत्रिका बदलून घ्यावी. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचावे. उत्तरे लिहितांना वारंवार खाडाखोड करू नये. त्यासाठी खात्री असलेले प्रश्न आधी सोडवावे. त्यामुळे पेपर तपासणाऱ्यावर चांगले ‘इम्प्रेशन’ पडेल. शेवटच्या दहा मिनिटा आपण सोडविलेली उत्तरे पुन्हा तपासून दुरुस्त करावी, काही राहून गेलेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.- डॉ. प्रशांत गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट, यवतमाळअक्षर चांगले असेल तर लेखनाला अधिक गुण मिळू शकतात.उत्तरातील नेमकेपणा, आटोपशीरपणा महत्त्वाचा असून परीक्षेत सलग लेखनाचा वेग कायम ठेवावा.परीक्षेसाठी वापरण्यात येणाºया पेनाचा उत्तम सराव झालेला असावा. अगदी नवा कोरा पेन नेणे टाळावे.उत्तरे लिहिताना मजकुरातील महत्त्वाचा भाग अधोरेखित करावा. अधोरेखा आवश्यक तितकीच असावी.परिच्छेदाची सुरुवात पानाच्या डावीकडे साधारण १ सेंटीमीटर अंतर ठेवून केलेली असावी आणि एका परिच्छेदात शक्यतो एकाच विवेचनाचा मुद्दा लिहिलेला असावा.विरामचिन्हांचा वापर उत्तरपत्रिकेत अचूक करावा.उत्तरलेखनात कृत्रिम किंवा पुस्तकी भाषा टाळून स्वत:च्या भाषेतील उत्तरेच प्रभावीपणे मांडावी.शक्यतो क्रमवार उत्तरे लिहावी. प्रश्न काळजीपूर्वक वाचावे. लिहिलेला बैठक क्रमांक तपासून घ्यावा.सारांश लेखन करताना परिच्छेदातील मध्यवर्ती कल्पना, विचार, मुख्य आशय लक्षात घ्यावा. आशयसूत्र बदलणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.प्रत्येक ओळीत बसणारी शब्दसंख्या प्रमाणबद्ध असावी, खूप दूर किंवा खूप जवळ अक्षरे काढणे टाळावे.घाईघाईत लिहिताना अनावधानाने वाक्य सदोष होते. त्यामुळे जे लिहित आहात, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. खाडाखोड टाळावी.

टॅग्स :Studentविद्यार्थी