शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खाण पट्ट्यात शेतीचे झाले तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले.

ठळक मुद्देवेकोलिची हेकेखोरी : शेतात साचले कंबरभर पाणी, कपाशी बुडाली

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील खाणपट्यातील शेतकऱ्यांना वेकोलिच्या हेकेखोरीचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी वेकोलिने चुकीच्या पद्धतीने मातीचे डंपींग करून मातीचे ढिगारे उभारल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.निलजई येथील कोळसा खाणीच्या चुकीच्या माती डंपींगमुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचले असून शेताला आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतांमध्ये जवळपास कंबरभर पाणी साचले असून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यामध्ये उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. कपाशीचे पीक पूर्णत: पाण्याखाली आले असून ही पिके आता उद्ध्वस्त झाली आहेत.वणी तालुक्यातील अहेरी, जुनाडा, पिंपळगाव, निलजई, तरोडा, निवली, बोरगाव, कोलगाव, मुंगोली, चिखली टाकळी या भागातही हिच परिस्थिती आहे. वेकोलिने ढिगारे उभे करताना पर्यावरणाचे सारेच नियम पायदळी तुडविले आहेत. ज्या जमिनी वेकोलिने संपादित केल्या नाहीत, त्या शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. शेती केली, तर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पिक घेता येत नाही. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांना छळत आहे.तक्रारी करूनही वेकोलिचे कानावर हातवेकोलिच्या मग्रुरीने खाण पट्टयातील शेतकरी कमालिचे त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी वारंवार तक्रारी करतात. परंतु शेतकऱ्यांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. या हंगामात खाणपट्टयातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. वेकोलिने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उकणीच्या माजी सरपंच संगीता खाडे यांनी केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती