शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीचा खटाटोप

By admin | Updated: October 26, 2014 22:47 IST

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या एकाही दिग्गजाला गड राखता आला नाही. या पराभवाला अनेक कारणे

यवतमाळ : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या एकाही दिग्गजाला गड राखता आला नाही. या पराभवाला अनेक कारणे असले तरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत सुंदोपसुंदी त्यातील महत्वाचे कारण होय. आता पराभवाचे चिंतन करण्याऐवजी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी निवडण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काही ठराविक नेत्यांची शनिवारी दुपारी बैठक झाली. राजकारणात दिग्गज असलेल्यांना त्यांच्या परंपरागत विरोधकांकडूनच मात मिळाली. यामुळे कुठलेही स्पष्टीकरण देण्याची सोय त्यांच्याजवळ नाही. प्रदीर्घ काळ सत्ता असूनही इतका दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांना कार्यकारिणी निवडण्याची आठवण झाली आहे. येथील नेते बरेचदा संघटनेच्या पुढे जाऊनही आपण आहोत, अशा तोऱ्यात वावरताना दिसले. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बैठकांमध्ये नेत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याच कार्यकर्त्यांची कशी मुसकटदाबी करता येईल याची व्युहरचना आखण्यातच नेते मंडळींचा वेळ खर्ची पडला. अशातच विधानसभा निवडणुका लागल्या आणि विरोधात असलेले परंपरागत स्पर्धक या काँग्रेस नेत्यांच्या पुढे निघून गेले. आज चारीमुंड्या चित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांना कार्यकारिणीची आठवण झाली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदारांची बैठक झाली. कुणालाही याबाबत सूचना न देताच जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत मर्जीतील ठराविक कार्यकर्त्यांकडून प्रस्तावही मागविण्यात येत आहे. दोन दिवसात काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या इतिहासात प्रथमच कार्यकारिणी नसताना निवडणूक झाल्याचे ज्येष्ठांकडून सांगण्यात येत आहे. निवडणूक काळात जिल्ह्याचे प्रभारी म्हणून डॉ.वजाहत मिर्झा यांची नियुक्ती केली होती. मात्र निवडणूक संपताच जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार सक्रिय झाले आहेत. त्यांच्या समवेत माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, संजय देशमुख यांनी काही निवडक सदस्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आता कार्यकारिणी निवडतानाही या नेत्यांकडून गटबाजी व वशिलेबाजीला प्राधान्य दिले जात काय याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)