शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहीर योजनेत खरे लाभार्थी वंचित

By admin | Updated: March 2, 2016 02:48 IST

सिंचन विहीर योजनेत प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शक तत्व हद्दपार झाल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.

उद्देशाला तिलांजली : शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारादिग्रस : सिंचन विहीर योजनेत प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शक तत्व हद्दपार झाल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे. योजनेतील मोजक्याच लाभार्थ्यांच्या कामाची पाहणी करून अर्थपूर्ण संबंध जोपासून लाभ दिल्या जातो, तर बहुतेकांना वंचित ठेवले जाते. या योजनेत खऱ्या लभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत डेहणी येथील नऊ शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.शेतसिंचनाच्या सुविधेतून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी होण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शासन दरबारातून विशेष अनुदानद्वारे धडक सिंचन योजना राबविली जाते. मात्र बहुतेक ठिकाणी भ्रष्ट कारभाराने योजनेच्या मुख्य उद्देशाला तिलांजली दिली जात आहे तर गावपातळीवरील ग्रामसभेतून योजनेचे खरे लाभार्थी निवड करणे क्रमप्राप्त असताना केवळ कागदोपत्री ग्रामसभेद्वारा निवड केल्याचा प्रकार समोर आलेला आहे.याच कारणाने शेती नसताना व शासकीय सेवेतील कर्मचारी प्रतीक्षा यादीत चमकले. प्रतीक्षा निवड प्रक्रियेदरम्यान बोगस लाभार्थीचे नावे समोर आल्याने चकीत झालेले काही शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विष्णू उंकडे यांनी न्यायालयीन लढा देऊन स्थगिती मिळविली. वर्षभराच्या स्थगितीनंतरही योजनेमधील तथाकथीत गैरप्रकार सुरूच असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.२०११-१२ मधील डेहणी येथील धडक सिंचन योजनेअंतर्गत मोजक्याच लोकांना विहिरी देण्यात आल्या. या कामात खोदकाम व बांधकाम पाणी न करता बोगस लाभार्थ्यांना अनुदान राशी देण्यात आली पण खऱ्या लाभार्थ्यांनी अनुदान राशी मागणी केली असता त्यांना हेतुपुरस्सर डावलण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणीच चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी माणगी पंचायत समिती सदस्य अमोल मोरे, उपसरपंच जयवंत अनचेटवार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)