जिल्ह्यात १४ हजार वाहनांवर केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:01:16+5:30

जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना होत्या. मात्र जिल्ह्यातील नागरिक या सूचना पाळण्यास तयार नाही. पोलीस प्रशासनाची वाहने गल्लीबोळातून वारंवार सूचना देत फिरत आहे. यानंतरही नागरिकांची वाहने कमी झाली नाही. वर्दळ कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही नियम बदलविण्यात आले.

Action taken on 14,000 vehicles in the district | जिल्ह्यात १४ हजार वाहनांवर केली कारवाई

जिल्ह्यात १४ हजार वाहनांवर केली कारवाई

Next
ठळक मुद्दे२४ लाखांचा दंड : एसपी पुन्हा उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कलम १८८ आणि १४४ नुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीतही रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी झाली नाही. यामुळे वाहतूक शाखेने का२वाईचा बडगा उगारत जिल्हाभरात १४ हजार वाहनांवर कारवाई केली. बुधवारी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार स्वत: रस्त्यावर उतरले होते.
जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना होत्या. मात्र जिल्ह्यातील नागरिक या सूचना पाळण्यास तयार नाही. पोलीस प्रशासनाची वाहने गल्लीबोळातून वारंवार सूचना देत फिरत आहे. यानंतरही नागरिकांची वाहने कमी झाली नाही. वर्दळ कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही नियम बदलविण्यात आले. वेळापत्रक बदलविल्यानंतरही ही गर्दी कमी होत नाही. हे पाहून पोलीस अधीक्षक एम. राज कुमार बुधवारी स्वत: विविध चौकांमध्ये जाऊन पाहणी करून आले. यावेळी त्यांना अनेक धक्कादायकबाबी दृष्टीस पडल्या.
कुठलेही काम नसताना युवक रस्त्यांवर वाहने चालवितात. त्यांच्याकडे परवाना नसतो. अशा स्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. एका वाहनावर एक नव्हे तर तीन-तीन जण बसतात. विशेष म्हणजे वर्दळ कमी झाल्याने वन वे मधूनही वाहने येताना दिसून आले. पोलीस विभागाने संचारबंदी लागू झाल्यापासून मंगळवारपर्यंत जिल्ह्यात १४ हजार वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २४ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यापुढे कारवाई तीव्र केली जाणार आहे.

विनाकारण रस्त्यावर धावणारे वाहन जमा होणार
कुठलेही काम नसताना रस्त्यावर येऊ नका, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. मात्र संचारबंदी कशी आहे हे पाहण्यासाठी युवक रस्त्यांवर उतरत आहे. अनेकांना आपण कशासाठी बाहेर आलो, याचे उत्तरच पोलिसांना सांगता आले नाही. यापुढे विनाकारण रस्त्यावर वाहने चालविल्यास, अशा वाहनांना जमा करण्याच्या सूचना वाहतूक शाखेने संबंधितांना दिल्या आहे.

Web Title: Action taken on 14,000 vehicles in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.