शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचा कारवाईचा धडाका सुरूच, आणखी ६५ जण केले बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:01 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ५५ दिवसांचा कालावधी लोटूनही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारची कारवाई केली जात आहे. कारणे दाखवा, निलंबन, बडतर्फ यासारखी कारवाई करण्यात येत आहे. कामावर येत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही मार्गांवर बसेस सोडण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वारंवार अल्टीमेटम देऊनही कामावर हजर होत नसल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी एसटीच्या यवतमाळ विभागातील ६५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. संपकाळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. आतापर्यंत बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील विविध आगारातून २० बसफेऱ्या विविध मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ५५ दिवसांचा कालावधी लोटूनही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारची कारवाई केली जात आहे. कारणे दाखवा, निलंबन, बडतर्फ यासारखी कारवाई करण्यात येत आहे. कामावर येत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही मार्गांवर बसेस सोडण्यात येत आहेत. शुक्रवारी २० बसफेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. कर्मचारीही आपल्या मागणीवर ठाम आहेत. कामावर रुजू होणारे कर्मचारीही वाढत आहेत; परंतु त्यात चालक-वाहकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. दरम्यान, ५१ दिवसानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. तर दुसरीकडे प्रवाशांना आता खासगी वाहतूक अंगवळणी पडल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. 

कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार - यवतमाळ विभागातील एका कर्मचाऱ्याला बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याविरोधात त्याने येथील कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या निकालानंतर महामंडळाने कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ केले. कारवाईपूर्वी कर्मचाऱ्यांना बजावली होती नोटीस - संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना विविध प्रश्न विचारत कारणमीमांसा नोटीस बजावण्यात आली होती. नियोजित कामगिरीवर गैरहजर, एसटीच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे या कारणांसाठी या कर्मचाऱ्यांवर दोषारोपपत्र दाखल करून नोटीस बजावली होती.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप