Accident teacher killed on Kalamb-Ralegaon road | कळंब-राळेगाव मार्गावर अपघातात शिक्षक ठार
कळंब-राळेगाव मार्गावर अपघातात शिक्षक ठार

ठळक मुद्देवडगाव फाटा। माजी सभापतींचा पुत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातातशिक्षक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास राळेगाव मार्गावरील वडगाव फाट्याजवळ घडली. अमित भोयर (रा.यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. ते कळंब पंचायत समितीच्या माजी सभापती मंदाताई भोयर यांचे चिरंजीव होते.
पिंपळगाव (रुईकर) येथील शेतावर ते दुचाकीने गेले होते. रात्री यवतमाळ येथे परत येत असताना वडगाव फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. घटनेची माहिती होताच नागरिकांनी त्यांना उपलब्ध साधनाद्वारे यवतमाळ येथे हलविले. रात्री ३ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते कळंब येथील जीवनदीप आश्रमशाळेवर शिक्षक होते. प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.


Web Title: Accident teacher killed on Kalamb-Ralegaon road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.