शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहनांमुळे अपघातात वाढ

By admin | Updated: May 20, 2014 23:57 IST

काळी-पिवळी व इतर वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सध्या जिल्ह्यात सुरू असल्याचे दिसून येते. लग्नसराई असल्यामुळे प्रत्येकाला वेळेवर पोहचण्याची घाई

यवतमाळ : काळी-पिवळी व इतर वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सध्या जिल्ह्यात सुरू असल्याचे दिसून येते. लग्नसराई असल्यामुळे प्रत्येकाला वेळेवर पोहचण्याची घाई आणि एसटी बसेसचा तुटवडा यामुळे अनेकजण नाईलाजास्तव खासगी अवैध वाहनांतून प्रवास करतात. यामुळे अपघातांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. आठ ते दहा व्यक्ती बसू शकतील, अशा वाहनांमध्ये २० ते २५ लोकांना कोंबून भरले जाते. चालकाजवळही नियमाबह्यरित्या प्रवाशांना बसविले जाते. यामुळे चालक योग्यरित्या वाहनसुद्धा चालवू शकत नाही. लहान वाहनांमध्ये माणसांना जनावरांसारखे कोंबून वाहनधारक प्रवास करीत आहेत. याकडे पोलिसंच्या वाहतूक शाखेचे आणि उपप्रादेशिक कार्यालयाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. कमी वेळात अधिक पैसा कमविण्याच्या नादात अवैध प्रवासी वाहनधारक वाटेल तसे प्रवासी कोंबत आहेत. धोकादायक प्रवास करीत अपघाताला निमंत्रण देत आहे.या प्रकारामुळे अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहे. मात्र याचे कुणालाही सोयरसुतक नाही. सध्या लग्नसराईमुळे अवैध प्रवासी वाहतुकदारांचे चांगलेच फावत असून हप्ता वसुलीमुळे पोलिसही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे. एकाच दिवशी अनेक विवाहांचे मुहूर्त असल्यामुळे नातेवाईकांच्या मित्रमंडळींच्या विवाह समारंभांना उपस्थिती लावण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीला घराबाहेर पडावे लागत आहे. लग्नासाठी उपस्थिती दाखविण्यासाठी घरातील लहानमोठे वेगवेगळ्या विवाह समारंभासाठी जात असतात. उन्हाळी सुटी, लग्नसराई असल्याने रस्त्यावरही वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. परिवहन मंडळाच्या बसमध्ये जागाच मिळत नसल्याने अनेक पाहुणे मंडळी मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून भरधाव वेगाने वाहने चालवितात. वºहाड्यांची गाडी चालविणार्‍यांना आपल्या वाहनात किती प्रवासी आहे, याचे भान राहत नाही. त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना होत आहेत. अपघात होऊ नये यासाठी कोणताही वाहन चालक स्वत:ची व प्रवाशांची काळजी घेताना दिसत नाही. लग्नसमारंभाला जाणार्‍या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिरस वाढत आहे. तरीही कुणीही खबरदारीचा प्रयत्न करीत नाही. वाहन चालकाच्या दुर्लक्षामुळे अनेक निष्पाप वºहाडींना आपल्या प्राण्यास मुकावे लागल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यापासून कोणीही बोध घेताना दिसत नाही. ग्रामिण भागात एसटी बसेसचा सर्वाधिक तुडवडा आहे. आतील गावांमधील नागरिकांना तर एसटी बस दिसणेच कठिण झाले आहे. अशावेळी सर्रास अवैध वाहनांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नसतो. परिसरात लग्नसराईत खचाखच भरुन प्रवासी वाहने भरधाव धावत आहे. वाहनात जागा मिळेल तेथे प्रवासी बसविले जाते. बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने वाहनांच्या कॅबीनवर, छतावर प्रवासी बसत आहेत. अनेकदा उभे राहून प्रवास करीत असतात. रस्त्यावर अनेक धोकादायक वळणांवर जीव मुठीत घेऊन लोंबकळत प्रवास करताना अनेकजण दिसतात. चालकाच्या कॅबिनवरील टपावर बसलेल्यांना विद्युत वहन तारा व झाडांच्या फांद्या तुडवित जीवेघेणा प्रवास करावा लागतो. असे चित्र पाहणार्‍यांचा थरकाप उडविणारे असते. यावर पोलिसांचा वाहतूक विभाग किंवा प्रादेशिक विभागातर्फे कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा रितीने अधिक नफा कमविण्याच्या हव्यासापोटी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांचे चांगलेच फावते. सर्वसामान्यांना आढळणार्‍या या प्रश्नाकडे संबंधित वाहतूक विभाग व उपप्रादेशिक विभाग कारवाई का करीत नाही, हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. (प्रतिनिधी)