शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

स्वस्त सोन्याचा लोभ नडला.. सेवानिवृत्त पोलिसाला ११ लाखांना लुटले; टोळक्याने मारहाण, पिस्टलही पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 15:59 IST

दबा धरून असलेल्या टोळक्याने सोने खरेदीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या मुलाला व साथीदाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले.

ठळक मुद्देयवतमाळच्या सेवानिवृत्त पोलिसाला बुलडाण्यात लुटले दहाजणांवर गुन्हा दाखल

यवतमाळ : येथील मोटार वाहन विभागातील सेवानिवृत्त सुपरवायझर सोन्याचे नाणे खरेदीत गंडविले गेले. खामगाव तालुक्यातील (बुलडाणा) घरोडा फाटा लोखंडा शिवारात ११ लाख ६६ हजार रुपयांना त्यांना लुटले. इतकेच नव्हे तर त्यांचे पिस्टल घेऊन टोळके फरार झाले. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

ही घटना २५ मार्च शुक्रवारी दुपारी घडली. राजेंद्र चंदूलाल जाधव, रा. राठोड लेआउट, नर्सिंगनगर, वडगाव असे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना अनिल चंदू भोसले, अभिषेक भोसले, दीपक चव्हाण, दिनकर भोसले यांच्यासह इतर आठजणांनी मारहाण करून लुटले.

राजेंद्र जाधव यांना त्यांचे विश्वासू शेखर माळवदे व अतुल नेवारे (दोघे रा. मसोला आर्णी) यांनी एका व्यक्तीला शेतात सोने मिळाले आहे, ते विकायचे आहे, असे सांगितले. यासाठी राजेंद्र जाधव मुलगा अनुप जाधव, दिनेश गुंडवारे, धरमसिंग गुडावरे, प्रेम सिंग राठोड यांना घेऊन सकाळी सात वाजता खामगाव येथे आले. नंतर त्यांनी सोने विकणाऱ्यांशी संपर्क केला.

धारूड फाटा येथे दोघाजणांनी राजेंद्र जाधव यांच्याकडे रोख असल्याची खात्री केली व नंतर पुढे नेले. तिथे दबा धरून बसलेल्या आठ ते दहाजणांनी हल्ला चढविला. यात रोख ५ लाख, पाच राऊंड असलेली पिस्टल, सोन्याची अंगठी, चेन असा ११ लाख ६६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. दबा धरून असलेल्या टोळक्याने सोने खरेदीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या मुलाला व साथीदाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले.

मारहाणीच्या घटनेतून कसेबसे सावरल्यानंतर राजेंद्र जाधव यांनी २६ मार्चला रात्री बारा वाजता हिवरखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसालाही आवरला नाही मोह

शेतात सापडलेले, घरात खोदकामात मिळालेले सोने स्वस्तात विक्रीचे बहाणे करून अनेकांची फसवणूक होते. असे गुन्हे पोलीस ठाण्यात अनेकदा दाखल होतात. खुद्द पोलीस विभागात काम करून सेवानिवृत्त झालेल्या सुपरवायझरलासुद्धा मोह आवरता आला नाही. बुलडाणा जिल्ह्यात बेदम मार खाऊन साडेअकरा लाखांची रोकड गेली, ही चर्चा पोलीस दलात रंगत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGoldसोनंtheftचोरीYavatmalयवतमाळbuldhanaबुलडाणा