शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

ढाणकी नगर पंचायतसाठी ८० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

नगराध्यक्ष पदासाठी सहा तर १७ सदस्य पदांसाठी ७४ असे एकूण ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनी ही निवडणूक लढविली. सर्वच पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी ढाणकी येथे तळ ठोकून बसले होते.

ठळक मुद्दे८० उमेदवार : सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील नवनिर्मित ढाणकी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी तब्बल ७९.८३ टक्के मतदान झाले. मतदारांनी पहिलीच निवडणूक असल्यामुळे उत्साहाने मतदान केले.नगराध्यक्ष पदासाठी सहा तर १७ सदस्य पदांसाठी ७४ असे एकूण ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनी ही निवडणूक लढविली. सर्वच पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी ढाणकी येथे तळ ठोकून बसले होते. रविवारी गावातील विविध पाच मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदारांनी उत्साह दाखविला. त्यामुळे सकाळी ११.३० पर्यंतच २७.४३ तर दुपारी १.३० वाजतापर्यंत ४५.२० टक्के मतदान झाले होते. दुपारी ३.३० वाजतापर्यंत ही टक्केवारी ६०.९३ वर पोहोचली. अखेरीस तब्बल ७९.८३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.नगराध्यक्ष पदाचे सहा व सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या ७४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता यंत्रबंद झाले आहे. मतदारांनी आपला कौल दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी सात पोलीस अधिकारी व ८० कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.आज मतमोजणीमतदानानंतर आता निकालाची उत्सुकता आहे. सोमवारी ढाणकी येथील शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी अंतीच मतदारांनी नेमका कोणता उमेदवार व कोणत्या पक्षाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका