शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

७१ संचालकांकडे ८० लाख थकीत

By admin | Updated: November 13, 2014 23:09 IST

तालुक्यातील ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ७१ संचालकांकडे तब्बल ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. बँकेने दिलेल्या कर्ज वारंवार मागणी करूनही आणि सवलती देऊनही भरण्यात आले नाही.

महागाव : तालुक्यातील ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ७१ संचालकांकडे तब्बल ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. बँकेने दिलेल्या कर्ज वारंवार मागणी करूनही आणि सवलती देऊनही भरण्यात आले नाही. आता सेवा सोसायट्यांची निवडणूक होणार असून यात थकबाकीदार संचालक अपात्र ठरणार आहे. त्यामुळे ही मंडळी मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पाया म्हणून विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाकडे बघितले जाते. परंतु हा पायाच मुळात खिळखिळा झाला आहे. तालुक्यातील २८ विविध कार्यकारी सहकारी संस्थांपैकी १५ संस्थेचे ७१ संचालक थकबाकीदार आहेत. संबंधित संचालकांना यापूर्वी कलम ७३ नुसार नोटीस बजावण्यात आली. परंतु हे संचालक जिल्हा बँकेचे मतदार असल्याने बँक आणि सहायक निबंधक कार्यालय ठोस कारवाई करायला कचरत आहे. १० नोव्हेंबर रोजी थकीत संचालकांना पुसद येथील सहायक निबंधक कार्यालयात सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते. थकीत संचालकांवर कार्यवाही करण्यासाठी कलम १९ अंतर्गत नोटीस बजावली असून वसुलीच्या कार्यवाहीकरिता त्यांच्या मालमत्तेवर आरआरसी ओपन करण्यात आल्याची माहिती तालुका सहकार निवडणूक अधिकारी सचिन कुळमेथे यांनी केली. थकीत संचालकांवर कारवाई प्रस्तावित असल्याने त्यांना आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाग घेता येणार नाही. मतदानाचा अधिकारी सहा वर्षाकरिता हिरावला जाणार आहे.महागाव तालुक्यातील हुडी सोसायटीचे नऊ संचालक थकीत आहे. त्यांच्याकडे आठ लाख ३० हजार थकबाकी आहे. पोखरीच्या सहा संचालकांकडे सहा लाख ५७ हजार, हिवराच्या पाच संचालकांकडे सहा लाख आठ हजार, पेढीच्या पाच संचालकांकडे एक लाख ६७ हजार, कान्हाच्या पाच संचालकांकडे दोन लाख ६० हजार रुपये, मुडाणाच्या पाच संचालकांकडे नऊ लाख ८६ हजार, शिरपूरच्या पाच संचालकांकडे सात लाख तीन हजार, काळीच्या चार संचालकांकडे आठ लाख, पोहंडूळच्या चार संचालकांकडे आठ लाख ६० हजार, मोरथच्या चार संचालकांकडे तीन लाख ३० हजार, सवनाच्या चार संचालकांकडे दोन लाख ६४ हजार, माळकिन्हीच्या चार संचालकांकडे तीन लाख ९४ हजार, साईच्या चार संचालकांकडे चार लाख ७९ हजार, वरुडच्या तीन संचालकांकडे दोन लाख ८० हजार, चिलगव्हाणच्या तीन संचालकांकडे ९३ हजार, अंबोडाच्या एका संचालकाकडे ६० हजार रुपये थकीत आहे. महागाव, शिरपूर, चिलगव्हाण, लेवा, धनोडा, गुंज, कान्हा, माळेगाव, आमणी आणि माळकिन्ही सोसायटीची मुदत संपली आहे. संचालक थकीत असल्याने त्यांची नावे मतदार यादीत येणार नाही. याद्याचे काम सुरू झाले असून येत्या डिसेंबरमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहे. या सर्व थकीत संचालकांवर कारवाई होणार असल्याने त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर दिसणार आहे. (शहर प्रतिनिधी)