शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

७६ उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा धोका

By admin | Updated: October 16, 2014 23:30 IST

झालेल्या एकूण मतदानाच्या सहापटीपेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात येते. अशा उमेदवारांची जिल्ह्यातील संख्या ७६ च्या घरात जाण्याचा अंदाज आहे.

यवतमाळ : झालेल्या एकूण मतदानाच्या सहापटीपेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात येते. अशा उमेदवारांची जिल्ह्यातील संख्या ७६ च्या घरात जाण्याचा अंदाज आहे.एका विधानसभा क्षेत्रात तीन प्रमुख राष्ट्रीय पक्ष आणि तीन प्रादेशिक पक्ष रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारही रिंंंंगणात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होत आहे. त्यातुन एक शष्टांश मते मिळविण्यासाठी प्रमुख पक्षांच्याच तोंडाला फेस आला आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये ५८ टक्के अर्थात दोन लाख एक हजार ४७४ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान ३३ हजार ५७९ मते लागणार आहेत. या खाली मतदान असणाऱ्याचे डिपॉझिट जप्त होईल. या मतदार संघात २२ उमेदवार रिंंंगणात आहे. पंचरंगी लढतीत मतदान विभागले जाईल आणि १८ ते १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचा धोका आहे.वणी विधानसभा क्षेत्रात एक लाख ९५ हजार २३३ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांच्या ७२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नियमानुसार डिपॉझिट वाचविण्यासाठी एका उमेदवाराला किमान ३२ हजार मत मिळवावे लागतील. या ठिकाणच्या पंचरंगी लढतीत इतर उमेदवारांना हा आकडा गाठतांना दमछाक होणार आहे. विजयाकडे आगेकुच करणाऱ्या उमेदवाराखेरीज इतर उमेदवारांची मते ३२ हजारांवर असतील तर डिपॉझिट वाचेल. इतर उमेद्वारांवर डिपॉझिट जप्तीचे गंडांतर येणार आहे. या ठिकाणी १३ उमेदवार रिंंंगणात आहेत. आठ उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा धोका आहे. राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ८१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे ३० हजार २८१ मतांवर मते मिळविणाऱ्या मतदाराला डिपॉझिट वाचविता येणार आहे. सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचा धोका आहे.दिग्रस विधानसभा क्षेत्रामध्ये दोन लाख ८५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी एक शष्टांश नियमानुसार ३३ हजार ४७५ पेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. नऊ उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा धोका आहे.आर्णी विधानसभा क्षेत्रात एक लाख ९८ हजार ५५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी ११ उमेदवार रिंंंंगणात उभे आहेत. ३३ हजार ९२ मतांपेक्षा कमी मतदान मिळाविणाऱ्या सात उमेदवारांवर डिपॉझिट जप्तीचा धोका आहे. पुसद विधानसभा क्षेत्रात एक लाख ७२ हजार ३८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी २८ हजार ३७१ मतदारांपेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा सामना करावा लागणार आहे. उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ८६ हजार ८९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी ३१ हजार १४८ मतापेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांना डिपॉझिट जप्तीला समोर जावे लागणार आहे. (शहर वार्ताहर)