शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

७५ भूखंड जप्तीच्या निशाण्यावर

By admin | Updated: September 29, 2016 01:13 IST

एमआयडीसीकडून उद्योग उभारणीसाठी भूखंड घेऊन निर्धारित कालावधीत उद्योग सुरू करू न शकणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास ७५ भूखंडधारकांवर

एमआयडीसी : उद्योग संजीवन योजनेत सहभागी होण्याची अखेरची संधी सुहास सुपासे  यवतमाळ एमआयडीसीकडून उद्योग उभारणीसाठी भूखंड घेऊन निर्धारित कालावधीत उद्योग सुरू करू न शकणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास ७५ भूखंडधारकांवर भूखंड जप्तीच्या निशाण्यावर आहे. यासाठी त्यांना शेवटची संधी दिली आहे. ‘उद्योग संजीवन-२०१५’ या योजनेत सहभागी होऊन ही कारवाई ते टाळू शकतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्योग उभारणीसाठी भूखंड घेऊन त्यावर ठराविक कालावधीत उद्योग सुरू न केल्यास असे भूखंड नियमानुसार एमआयडीसी परत घेऊ शकते. अशा परत घेतलेल्या भूखंडांचा पुन्हा लीलाव करून उद्योग उभारणीसाठी इच्छुक असलेल्यांना ते देता येऊ शकतात. जिल्हा एमआयडीसी कार्यालयाच्या लेखी सध्या ७५ च्या आसपास असे भूखंड आहेत, ज्यांनी नियमानुसार ठराविक कालावधीत उद्योग सुरू केलेले नाही. अशा भूखंडधारकांना एमआयडीसीने वारंवार नोटीस बजाविल्या आहेत. आता या भूखंड धारकांना शेवटची संधी म्हणून त्यांना संजीवन योजनेत सहभागी होता येईल. या योजनेत सहभागी होऊन ते मुतदवाढ मागवून उद्योग उभारू शकतात, परंतु या योजनेत ठराविक कालावधीत ते सहभागी न झाल्यास औद्योगिक महामंडळाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. उद्योगाविना एमआयडीसीतील भूखंड नियमबाह्यरित्या ताब्यात ठेवणाऱ्या उद्योजकांसाठी उद्योग विभागाने ‘उद्योग संजीवन २०१५’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये सहभागी भूखंडधारकांना उद्योग उभारणीसाठी संधी व सवलत दिली जाते. या योजनेचा पहिला टप्पा संपला असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ७३ भूखंडधारकांना या योजनेत सामावून घेण्यात येऊन त्यांना संधी देण्यात आली. परंतु या योजनेत सहभागी न झालेल्या व विकास कालावधी संपलेले ३३ भूखंड परत घेण्यात आले आहे. अशाप्रकारची कारवाई करण्यामध्ये राज्यात यवतमाळ जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आता संजीवन योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कालावधी संपलेल्या ७५ भूखंडधारकांनी या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. संजीवन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मुदत ३१ आॅक्टोंबर २०१६ ला संपत आहे. तोपर्यंत योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज स्वीकारणे सुरू आहे. ज्या भूखंड धारकांचा विकास कालावधी ३१ आॅगस्ट २०१३ पूर्वी संपलेला आहे, असे भूखंडधारक संजीवन मध्ये सहभागी होऊ शकतात. अर्ज स्वीकृतीच्या तारखेनंतर मात्र भूखंड परत घेण्याचे कठोर धोरण महामंडळाकडून अवलंबिले जाणार आहे. उद्योग महामंडळाने अवलंबिले कठोर धोरणसंजीवन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी न होणारे व ज्यांचे बांधकाम पूर्णत्वाचे दाखले अद्याप अप्राप्त आहेत, तसेच ज्यांचा विकास कालावधी संपलेला आहे, असे सर्व भूखंड आहे त्या स्थितीत जप्त करण्याची कारवाई करण्याबाबत उद्योग महामंडळ गंभीर आहे. याचा विचार सबंधित भूखंडधारकांनी करणे आवश्यक आहे.