शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदच्या आंदोलनाचा ७२ वा दिवस

By admin | Updated: October 17, 2016 01:45 IST

येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील १२५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी तब्बल ७२ दिवसांपासून आंदोलनोच शस्त्र उपसले आहे.

विद्यार्थी वाऱ्यावर : १२५ कर्मचारी बेमुदत उपोषणावर पुसद : येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील १२५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी तब्बल ७२ दिवसांपासून आंदोलनोच शस्त्र उपसले आहे. मात्र व्यवस्थापनाने अद्यापही दखल घेतली नाही. पुसदसारख्या डोंगराळ व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे तसेच ग्रामीण रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने पुसद येथील गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाची स्थापना १७ आॅगस्ट १९९२ रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी केली. प्रारंभीचे काही दिवस महाविद्यालयाची प्रगती झाली. येथून दरवर्षी ५० विद्यार्थी बीएएमएसची पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र मागील काही वर्षांपासून येथील व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार वाढल्याचे चित्र आहे. येथे १२५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असून मागील २५ वर्षांपासून या महाविद्यालयात अनेक समस्यांचा डोंगर असून कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन दिले जाते. कर्मचाऱ्यांचे मार्च २०१४ ते आॅगस्ट २०१४ असे सहा महिन्यांचे वेतन थकीत असून एप्रिल २०१६ पासून सप्टेंबर २०१६ असे सहा महिन्याचे वेतन देण्यात आले नाही. येथील कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग अपूर्ण दिला असून सहावा आयोग लागूच केला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर २०१० पासून पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे अनेकांच्या पॉलिसी लॅप्स झाल्यात. बँकांचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. येथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी सर्व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाविरुद्ध एल्गार पुकारला असून ४ आॅगस्ट रोजी काळ्याफिती लावून निषेध नोंदवून ५ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. येथील कर्मचारी उपाशी तर अध्यक्ष व प्राचार्य तुपाशी असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आमदार मनोहरराव नाईक, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, उपविभागीय अधिकारी, नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार डॉ. संजय गरकल आदींनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. आता या कर्मचाऱ्यांचा प्रश्न व्यवस्थापन कसा सोडविते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)