शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात ५७ टक्के ‘बरसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

जून महिन्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. जूनच्या पावसात ३२ टक्के तूट होती. जुलैमध्ये मासिक सरासरीच्या अधिक पाऊस झाला. जून आणि जुलैमधील मासिक सरासरी १०३ टक्क्यांवर पोहचली . हा पाऊस पिकांसाठी पोषक आहे. तसाच तणाचीही वाढ करणारा आहे. यामुळे तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी केलेली फवारणी व्यर्थ ठरली आहे. प्रारंभी काहीकाळ तणाची वाढ थांबली.

ठळक मुद्देतणनाशक ठरले निकामी : शेतात मजूर तुटवडा, जून-जुलैच्या पावसाची मासिक सरासरी गाठली

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मागील दोन महिन्यात मासिक सरासरीच्या १०३ टक्के पाऊस झाला, तर वार्षिक सरासरी ५७ टक्के गाठली आहे. सततच्या पावसाने शेतातील तणनाशकाचा प्रयोग निकामी ठरला आहे. निंदणासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. शेतात पीक आणि तणामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. तणांचा पिकांना फटका बसत आहे.जून महिन्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. जूनच्या पावसात ३२ टक्के तूट होती. जुलैमध्ये मासिक सरासरीच्या अधिक पाऊस झाला. जून आणि जुलैमधील मासिक सरासरी १०३ टक्क्यांवर पोहचली .हा पाऊस पिकांसाठी पोषक आहे. तसाच तणाचीही वाढ करणारा आहे. यामुळे तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी केलेली फवारणी व्यर्थ ठरली आहे. प्रारंभी काहीकाळ तणाची वाढ थांबली. नंतर मात्र तण जोमाने वाढून पिकांच्या वर गेले आहे. आता शेतशिवारात पीक आणि तण बरोबरीणे वाढले आहे. यामुळे किडीचा प्रकोप वाढून उत्पादन घटण्याचा मोठा धोका आहे.तणनाषकांचा खर्च निंदनाच्या तुलनेत कमी येतो. यामुळे सर्वच शेतकºयांनी तणनाषकाची फवारणी केली. तणनाषकाचा प्रभाव झाला नसल्याने शेतकऱ्यावर निंदणाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. याची क्षमता प्रत्येक शेतकºयांमध्ये नाही. यामुळे शेतकरी धास्तावले आहे. निंदणाकरिता लागणाऱ्या पैशासाठी शेतकरी सावकाराकडे येरझारा मारत आहे. जिल्ह्यात मजुरांचाही तुटवडा आहे. यातून स्थिती अधिकच बिकट झाली आहे.

पिकांची वाढ, फुलांची संख्या कमीसततच्या पावसाने पिकांची जोमाने वाढ होत आहे. ही वाढ नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फवारणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पिकांची उंची वाढल्याने शाखीय वाढ थांबली आहे. परिणामी फुलांची संख्या घटली आहे. याचा फटका उत्पादनाला बसण्याचा धोका आहे.

टॅग्स :Rainपाऊस