५० वर्षीय नराधमाचा नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 17:41 IST2021-12-16T17:27:41+5:302021-12-16T17:41:06+5:30

९ वर्षीय मुलगी संध्याकाळच्या वेळेस खेळून घराकडे जात असताना आरोपीने ५० रुपये देण्याचे आमिष दाखवून राहत्या घरी नेऊन तेथे अत्याचार केला. या घटनेनंतर भयभीत अवस्थेत घरी परतलेल्या मुलीने आईला आपबीती सांगितली.

50 year old man arrested for sexual abuse of nine year old girl | ५० वर्षीय नराधमाचा नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

५० वर्षीय नराधमाचा नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्गालगतच्या तालुक्यातील एका गावात ५० वर्षीय इसमाने अवघ्या नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चिमुकली गुरुवारी सायंकाळी खेळून घराकडे जात होती. त्यावेळी आरोपी तुकाराम किसन सिंगाडे (५०) याने तिला ५० रुपये देण्याचे आमिष दाखविले. नंतर तिला राहत्या घरी किचनमध्ये घेऊन गेला. तेथे चिमुरडीवर अत्याचार केला. या घटनेनंतर भयभीत अवस्थेत घरी परतलेल्या चिमुरडीने आईला आपबीती सांगितली.

तिच्या आईने तत्काळ गुरुवारी रात्रीच आर्णी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गाव गाठून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंवि ३६६ अ, ३७६ अ, ब, ३७६ (२), जे ३७७ आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय नागेश जायले, जमादार भारती, अरुण पवार पुढील तपास करीत आहे.

Web Title: 50 year old man arrested for sexual abuse of nine year old girl