शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

वणीत मारहाण करून जिनिंग व्यवस्थापकाचे ४५ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

सदर रक्कम त्यांनी बॅगमध्ये भरून ते स्कुटीने निळापूर-ब्राम्हणी मार्गावरील इंदिरा जिनिंगकडे निघाले. वणी-वरोरा बायपासवरून ते निळापूर मार्गाकडे वळल्यानंतर अयफाज जिनिंगपुढे मागाहून येणाऱ्या इंडिगो कारमधील दोघांनी खाली उतरून मनिष जंगले यांना अडविले. लगेच त्याला मारहाण करून त्याच्याजवळील ४५ लाख रूपये ठेऊन असलेली बॅग हिसकावली व ते पुन्ह कारमध्ये बसले. कारमध्ये एकूण तिघेजण असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देबॅंकेवर होती पाळत : लुटारूंचे वाहन ‘सीसीटीव्ही’त कैद

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील ब्राम्हणी फाट्याजवळील इंदिरा कॉटन जिनिंगच्या सुपरवायझरजवळील ४५ लाख रूपये लंपास करण्यात आले. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास ब्राम्हणी फाट्यावर घडली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी व पथकाने घटनास्थळी रात्री भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एसपींच्या मार्गदर्शनात आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत. निळापूर-ब्राम्हणी रोडवर मामराज अग्रवाल यांचे इंदिरा कॉटन जिनिंग आहे. शनिवारी दैनंदिन व्यवहाराकरिता लागणारी रक्कम काढण्यासाठी जिनिंगचे सुपरवायझर मनिष जंगले हे दुपारी वणीतील बँक ऑफ इंडिया या बँकेत पोहोचले. तेथे त्यांनी ४५ लाख रूपयांची रक्कम बँकेतून काढली. सदर रक्कम त्यांनी बॅगमध्ये भरून ते स्कुटीने निळापूर-ब्राम्हणी मार्गावरील इंदिरा जिनिंगकडे निघाले. वणी-वरोरा बायपासवरून ते निळापूर मार्गाकडे वळल्यानंतर अयफाज जिनिंगपुढे मागाहून येणाऱ्या इंडिगो कारमधील दोघांनी खाली उतरून मनिष जंगले यांना अडविले. लगेच त्याला मारहाण करून त्याच्याजवळील ४५ लाख रूपये ठेऊन असलेली बॅग हिसकावली व ते पुन्ह कारमध्ये बसले. कारमध्ये एकूण तिघेजण असल्याचे सांगितले जाते. ही कार पुन्हा वणी-वरोरा बायपासवर आली. त्यानंतर ती कुठे निघून गेली, याची मात्र अद्याप माहिती मिळाली नाही. दरम्यान, मनिष जंगले यांनी यासंदर्भात जिनिंगच्या मालकांना माहिती दिली. त्यानंतर वणीच्या पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेची पोलिसांना हकीकत सांगितली. लगेच एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी लुटारूंच्या शोधासाठी वेगवेगळी पथके गठीत करून लुटारूंच्या शोधात या पथकांना रवाना केले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत लुटारूंचा थांगपत्ता लागला नव्हता. वृत्तलिहिस्तोवर लुटारूंचा सुगावा लागलेला नव्हता. 

 

टॅग्स :Robberyचोरी