शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारी ४४ टक्के

By admin | Updated: November 15, 2014 02:07 IST

जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४४ टक्के निघाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल करणार आहेत.

यवतमाळ : जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४४ टक्के निघाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल करणार आहेत. आणेवारी ४४ टक्के निघाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्याची पीक परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यानंतरही पिकांची नजरआणेवारी तलाठ्यांनी ५४ टक्के काढली होती. या नजर आणेवारीवर आणि ती काढण्याच्या पद्धतीवर तीव्र टीका झाली. शेतकरी बुडला असताना आणेवारी ५४ टक्के कशी असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानंतर प्रशासनाने सावधगिरीने पीक आणेवारी काढली. त्याला वास्तवतेचा टच दिला. शेतीच्या बांधावर जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधींनी वृत्तांकन केले. शेती आणि शेतकऱ्यांची वास्तव स्थिती उघड केली. त्याची दखल घेऊन अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी थेट यवतमाळ जिल्ह्यातील शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी करीत शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली होती. त्यांनी वटफळी, कोलुरा, उत्तरवाढोणा, सोनखास, लासीना या गावांना भेटी दिल्या होत्या. त्यांनाही शेतकऱ्यांनी या तोट्याच्या शेतीचा हिशेब समजावून सांगितला. त्यानंतर वास्तव आणेवारीची चक्रे फिरली. सुरुवातीला नजर आणेवारी ५४ टक्के होती आता ही आणेवारी ४४ टक्के निघाली आहे.त्यात सर्वात कमी ३६ टक्के आणेवारी ही नेर तालुक्याची तर सर्वात जास्त ४८ टक्के आणेवारी वणी तालुक्याची आहे. जिल्ह्यातील दोन हजार १४८ गावांपैकी दोन हजार ५० महसुली गावांची ही सरासरी ४४ टक्के आणेवारी काढली गेली आहे. यानंतर १५ जानेवारीला अंतिम पीक आणेवारी काढली जाणार आहे. त्यावेळीही आणेवारीची स्थिती हीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश स्थितीतील सोईसुविधांचा लाभ मिळणार आहे. त्यात शेतसारा माफी, करमाफी, कृषीपंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत, पीक कर्जाचे रुपांतरण या सुविधा शासनाकडून दिल्या जातील. बँकेला सक्तीची कर्ज वसुली करता येणार नाही. यावेळी ४४ टक्के निघालेली आणेवारी ही वास्तव आहे. प्रत्यक्षात शेतीची अवस्था या पेक्षाही वाईट आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन क्ंिवटलही सोयाबीन झालेले नाही. कपाशीची अवस्थाही अशीच आहे. (शहर वार्ताहर)