शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
3
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
4
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
5
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
6
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
7
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
8
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
9
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
10
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
11
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
12
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
13
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
14
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
15
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
16
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
18
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
19
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
20
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी २४ कोटींचा कृती आराखडा

By admin | Updated: October 2, 2015 07:10 IST

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता २४ कोटींचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. शेतमालाच्या

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता २४ कोटींचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. शेतमालाच्या विक्रीसाठी नवे धोरण आखण्यात आले आहे. यामध्ये शेतीशी निगडित विविध विभागांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविले जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी पाच वर्षाचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. राज्य शासनाकडून कृषीक्षेत्र विस्तार आणि संशोधन आराखडा तयार करण्याच्या सूचना आत्मा विभागाला देण्यात आल्या होत्या. आत्माच्या माध्यमातून वर्षभरापासून हा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. पूर्णत्वास आलेला आराखडा आता जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतजमिनीचा पोत कसा आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठल्या उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांनी माती परीक्षण केले का, परीक्षण झाले नसेल तर त्यासाठी काय उपाय करावे, याबाबत आराखड्यात उपाय सूचविण्यात आले आहे. पीक पद्धती कशी आहे, नवीन कोणते पीक घेता येईल, सिंचनाची सुविधा काय आहे, सूक्ष्म सिंचनाचा लाभ किती शेतकऱ्यांनी घेतला, फळबाग लागवडीसाठी शेतकरी उत्सूक आहेत का, भाजीपाला उत्पादनात काय करता येईल, याचे विश्लेषण आराखड्यात करण्यात आले आहे. त्याकरिता मार्केटिंग प्लान तयार करण्यात आला आहे. शेतकरी बचतगटांची मदत घेतली जाणार आहे. सोयाबीनपासून तेलनिर्मिती पणीर, दूध आणि दह्याची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. असा आहे आराखडा४५०० पानांच्या या कृती आराखड्यात १७ कोटी २५ लाख रूपयांच्या योजना आहेत. त्यात पशुधन विभाग ४ कोटी २८ लाख, दुग्धविकास विभाग ४२ लाख, रेशीम विभागाच्या ५५ लाख रूपयांच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहे. मत्स्य विभाग ३२ लाख, सामाजिक वनीकरणाच्या ६५ लाखांच्या उपाययोजना आहे. आत्महत्या रोखण्यासाठी उपाय शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पीक पद्धतीत विविधता आणणे, समुपदेशन करणे, जोडधंद्यासाठी कर्ज देणे, सेंद्रीय शेती, शेतकरी गट तयार करणे, तालुका स्तरावर व्यासपीठ तयार करणे, यशस्वी शेतकऱ्यांचा गाव स्तरावर सत्कार करणे, शेतकऱ्यांना योजनेशी जोडणे यासह विविध बाबींचा आराखड्यात समावेश आहे.