शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

२० गावे तहानलेलीच

By admin | Updated: May 19, 2014 23:56 IST

पाणीटंंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात यंदाही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेलोरा सर्कलमधील तब्बल २० गावे १५ दिवसांपासून तहानलेली आहे.

नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

अखिलेश अग्रवाल - पुसद

पाणीटंंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात यंदाही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेलोरा सर्कलमधील तब्बल २० गावे १५ दिवसांपासून तहानलेली आहे. पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत असून सायकल, बैलगाडीने पाणी आणावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची मनमानी आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शेकडो नागरिकांंना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भाग गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईची झळ सहन करीत आहे. वाड्या-तांड्यांमध्ये पाण्यासाठी हाहाकार असतो. बेलोरा जिल्हा परिषद सर्कलमधील जलस्रोत आटले आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून २० गावांना पाणीच मिळत नाही. मारवाडी खुर्द, मारवाडी बु., वसंतवाडी, रोहडा, मांजरजवळा, बेलोरा, कुंभारी, हनुमाननगर, पांढुर्णा, छोटा बेलोरा, कान्हेरवाडी, वाघजाळी, आसोला, पन्हाळा, म्हैसमाळ, हनवतखेडा, नांदुरा, सत्तरमाळ, पिंपळगाव या गावातील ३३ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहाटे ५ वाजतापासून पाण्यासाठी दोन तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. पाणीपुरवठा योजना असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, ही शोकांतिका आहे. फेट्रा येथे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेतून प्रत्येक गावांना पाईपलाईन टाकण्यात आली आहे. वसंतवाडी ते पिंपळगाव या रस्त्यावरील पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. तसेच मारवाडी ते रोहडा या रस्त्यावर चार ठिकाणी पाणी धो-धो वाहते. रोहडा ते बेलोरा या रस्त्यावर असलेल्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. लिकेजमुळे पाणी माती मिश्रीत होत असल्याने ते पिण्यायोग्यही राहत नाही. त्यामुळे नागरिकांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. मारवाडी, वसंतवाडी, हनुमाननगर व इतर तांड्यातील नागरिक मारवाडी बु. येथील रस्त्यालगत असलेल्या संतोष मुराई यांच्या शेतातील विहिरीवरून पाणी आणतात. पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंंता वाशिम येथून जाणे येणे करतात. त्यामुळे त्यांचे याकडे लक्ष नाही. उन्हाच्या दाहकतेसोबत पाणीटंचाईचा प्रश्नही उग्ररुप घेत आहे. गळतीची कामे मार्च-एप्रिलमध्ये पूर्ण करण्याऐवजी आता या कामाला सुरुवात करणार असल्याचे समजते. गावकर्‍यांना पाणी केव्हा मिळणार हा प्रश्न आहे. कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदाराच्या संगनमतानेच २० गावातील नागरिकांना १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही, असा आरोप आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते जून या महिन्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात मारवाडी खुर्द, पन्हाळा, म्हैसमाळ या गावांचा समावेश आहे. या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आराखड्यात मंजूर आहे. आता मे महिना संपला तरी अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे १५ दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी पायपीट करीत आहे. भारनियमनाचे चटके पाणीटंचाई उग्र होण्यात भारनियमनाचाही मोठा हातभार आहे. वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्याने गावागावातील पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब लागतो. परिणामी पाणीटंचाई तीव्र रुप घेत आहे. सोमवार ते गुरुवार पहाटे ५ ते सकाळी ९.३० आणि शुक्रवार ते रविवार सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत भारनियमन असते. त्यामुळे पाणीपुरवठा योजना पूर्णत: ठप्प असते.