१६ सभापतींची रविवारी निवड

By Admin | Updated: September 14, 2014 00:12 IST2014-09-14T00:12:36+5:302014-09-14T00:12:36+5:30

जिल्ह्यातील सोळाही पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड रविवार, १४ सप्टेंबरला होत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवड प्रक्रिया राबविली जात आहे.

16th Sunday's selection | १६ सभापतींची रविवारी निवड

१६ सभापतींची रविवारी निवड

यवतमाळ : जिल्ह्यातील सोळाही पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड रविवार, १४ सप्टेंबरला होत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवड प्रक्रिया राबविली जात आहे.
नेर पंचायत समिती सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला सदस्यासाठी निघाले. मात्र या प्रवर्गातील सदस्य नसल्याने भरत मसराम यांची निवड केवळ औपचारिकता ठरणार आहे. पुसद, नेर, मारेगाव येथे सभापतींची निवड अविरोध होणार आहे. घाटंजी, यवतमाळ, वणी येथील आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आहे. महागाव, आर्णी, बाभूळगाव, कळंब या पंचायत समितीचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी आहे. राळेगाव, उमरखेड मागास प्रवर्ग महिलांकरिता राखीव आहे. मारेगाव अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. दारव्हा येथे उज्ज्वला बनसोड यांची निवड केवळ औपचारिकता ठरणार आहे. येथील पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य जोर लावून आहे. बहुतांश ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहे. काही ठिकाणी अभद्र युती होण्याचीही शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीमुळे सभापती-उपसभापती निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: 16th Sunday's selection