शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात १६५० ग्राहकांची वीज तोडली

By admin | Updated: November 12, 2016 01:43 IST

महावितरणकडून जिल्ह्यात सध्या वीज बिल वसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे.

महावितरणची धडक मोहीम : १ लाख ८३ हजार ग्राहकांकडे चालू बिलाची थकबाकीयवतमाळ : महावितरणकडून जिल्ह्यात सध्या वीज बिल वसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत एका महिन्यात १६५० थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक प्रकारातील चालू बिलाची थकबाकी असणारे तब्बल १ लाख ८३ हजार ८२८ ग्राहक आहे. या ग्राहकांकडे एकूण ३७ कोटी ३२ लाख ५७ हजार रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांना वारंवार नोटीस बजावूनसुद्धा यांनी वीज बिलाचा भरणा केला नसल्याने वीज कंपनीने वसुलीसाठी एक महिन्यापासून धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत ३३ हजार ८३१ वीज ग्राहकांनी ७ कोटी ३८ लाख ७० हजार रुपये वीज बिलाचा भरणा करून पुढील कारवाई टाळली आहे. यादरम्यान मोहिमेला प्रतिसाद न देणाऱ्या १६५० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करण्यात आला आहे. सहा महिन्यात त्यांनी आपल्याकडील देयकाचा भरणा न केल्यास तो कायमस्वरुपीसुद्धा खंडीत केला जाऊ शकतो. याच मोहिमेदरम्यान ३२३ ग्राहकांचा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महावितरणचे यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद असे तीन विभाग आहे. चालू बिलाच्या थकबाकीवर विभागवार नजर टाकल्यास यवतमाळ विभागात ७१ हजार ५२३ थकबाकीदार ग्राहक असून यांच्याकडे १५ कोटी ४६ लाख ३३ हजार रुपये आहेत. यातील २४ हजार २७ ग्राहकांनी गेल्या एक महिन्यात ५ कोटी ४४ लाख ६५ हजार रुपये भरले. ९३५ ग्राहकांना तात्पुरता तर ३७ ग्राहकांचा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडी करण्यात आला आहे. पांढरकवडा विभागातील ४६ हजार ५८ ग्राहकांकडे ९ कोटी ६२ लाख रुपये थकबाकी आहे. यातील ५ हजार ७३६ ग्राहकांनी १ कोटी ३० लाख रुपये भरले. ३३२ ग्राहकांचा तात्पुरता तर २४६ ग्राहकांचा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या २४६ ग्राहकांकडे १४ लाख ८७ हजार रुपये थकबाकी आहे. पुसद विभागात ६६ हजार २४७ थकबाकीदार वीज ग्राहकांकडे १२ कोटी २४ लाख १८ हजार रुपये थकबाकी आहेत. यातील चार हजार ६८ ग्राहकांनी ६४ लाख रुपये भरले. ३८३ वीज ग्राहकांचा तात्पुरता वीज पुरवठा तर ४० लोकांचा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज कंपनीकडून वर्षभर वसुलीसाठी धडक मोहीम राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे ही आकडेवारी चालू बिलाबाबत आणि केवळ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदार ग्राहकांचीच आहे. यामध्ये कामयस्वरुपी खंडीत असलेल्या वीज ग्राहकांचा तसेच कृषी आणि अभय योजनेतील वीज ग्राहकांचा समावेश नाही. ही सर्व थकबाकी पाहल्यास हा आकडा आणखी कितीतरी मोठा होईल. सध्या महावितरणच्या धडक वसुली मोहिमेचा अनेकांनी धसका घेतला असून देयकाचा भरणा करून पुढील कारवाई टाळण्यावर जोर देत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)