धक्कादायक... एकाच रात्री चोरले दहा सौरऊर्जा पॅनल, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
By विलास गावंडे | Updated: August 27, 2023 17:16 IST2023-08-27T17:15:50+5:302023-08-27T17:16:16+5:30
रविवारी सकाळी उघडकीस आला हा प्रकार.

धक्कादायक... एकाच रात्री चोरले दहा सौरऊर्जा पॅनल, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
दारव्हा (यवतमाळ) : येथील तीन शेतातील दहा सौरऊर्जा पॅनलच्या प्लेट चोरीला गेल्या. हा प्रकार रविवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आला.
दारव्हा शिवारात असलेल्या मनोज वामनराव दुधे यांच्या शेतात पाच प्लेटची चोरी झाल्याचे सुरुवातीला निदर्शनास आले. लगत असलेल्या अशोक चंपतराव ताजने यांच्या शेतात जाऊन पाहिले असता त्यांचेही चार सौर ऊर्जा पॅनल लंपास झाल्याचे दिसून आले. अरविंद चंपत ताजने यांच्याही शेतात अशीच घटना घडली, असून एक प्लेट चोरीला गेली.
शेतकर्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विज भारनियमनामुळे शेतात सिंचनाकरिता वीज पुरवठा कमी पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून सौर ऊर्जेद्वारे विजेची व्यवस्था केली. परंतु चोरट्यांनी त्यावरच हात मारला. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले आहे. त्यात आता या चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.