हे तर सर्वांना शिक्षण नाही 'शिक्षा' अभियान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 16:26 IST2018-07-11T16:24:03+5:302018-07-11T16:26:06+5:30
यवतमाळमधील कळंब तालुक्यातील सोनखास गाव अजूनही पारतंत्र्यातच असल्याचे चित्र आहे. कारण, विद्यार्थ्यांना कळंबमधील शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी चिखलाचा रस्ता पार करत ...
यवतमाळमधील कळंब तालुक्यातील सोनखास गाव अजूनही पारतंत्र्यातच असल्याचे चित्र आहे. कारण, विद्यार्थ्यांना कळंबमधील शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी चिखलाचा रस्ता पार करत जीवघेणी कसरत करावी लागत आहे. 2004 साली या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. 14 वर्ष लोटूनही पुढील कामाचा मुहूर्त अद्यापपर्यंत शासनाला सापडलेला नाहीय. यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.