Next

गायीच्या गोठ्यातील चार विषारी सापांना एकाच वेळी पकडून दिले जीवदान  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 08:30 PM2017-11-13T20:30:38+5:302017-11-13T20:31:08+5:30

वाशीम- मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील लाठी येथील शेतशिवारात शेतकरी मनोहर सुर्वे यांच्या गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून सापांचा वावर मनोहर ...

वाशीम- मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील लाठी येथील शेतशिवारात शेतकरी मनोहर सुर्वे यांच्या गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून सापांचा वावर मनोहर सुर्वे यांना आढळून आला. गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून वावरत असलेल्या घोणस जातीच्या (रसेल वायपर) विषारी सापांना वन्यजीव रक्षक गौरव कु मार इंगळे आणि त्यांच्या सहकाºयांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडत जंगलात सोडून जीवदान दिले.