Next

ट्रेनमधील वेटरच्या ड्रेसवरून 'रामायण' Railway Waiter Sadhu costume | Ramayana Train - INDIAN RAILWAY

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 03:21 PM2021-11-18T15:21:52+5:302021-11-18T15:23:05+5:30

धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं खास रामायण सर्किट ट्रेन सुरु केली, रामायण जिथं जिथं घडलं त्याठिकाणची यात्रा रामायण सर्किट ट्रेनमधनं करता येते. पण आता या ट्रेनमुळे वाद सुरु झालाय. ट्रेनमध्ये जे रेस्टॉरंट आहे त्यात भगवी वस्त्रं घालून वेटर जेवण वाढतात, प्रवाशांना मदत करतात. वेटर्सना साधूचा लूक देण्यात आलाय. साधूसारखे दिसणारे वेटर्स प्रवाशांना हवं-नको ते पुरवतात, त्यांना जेवण वाढतात आणि त्यामुळेच वाद सुरु झालाय. वेटर्सना जो साधूचा लूक देण्यात आलाय त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय, म्हणूनच धार्मिक भावना दुखावल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.