Next

ठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 11:36 AM2018-03-22T11:36:18+5:302018-03-22T11:36:52+5:30

ठाणे - सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा ...

ठाणे - सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पाटलीपाडा भागात वाघबीळ पुलाजवळ ऑइल कंटेनर उलटल्याची ही घटना घडली आहे. ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेनं जाणारी एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे बाजूच्या लेनमधून बोरिवलीकडे हळूहळू गाड्या सोडल्या जात आहेत.

टॅग्स :ठाणेthane