Next

कुडाळ तालुक्यात साजरा झाला बंधारा दिवस, केवळ लोकसहभागातून बांधले ३७९ बंधारे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 06:51 PM2017-11-17T18:51:02+5:302017-11-17T18:51:35+5:30

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : कुडाळ तालुक्यातील पाणीपातळी वाढण्यासाठी कुडाळ पंचायत समितीने शुक्रवारी तालुक्यात बंधारा दिवस जाहीर करीत शासकीय ...

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : कुडाळ तालुक्यातील पाणीपातळी वाढण्यासाठी कुडाळ पंचायत समितीने शुक्रवारी तालुक्यात बंधारा दिवस जाहीर करीत शासकीय निधीचा वापर न करता केवळ लोकसहभाग व श्रमदानातून संपूर्ण तालुक्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३७९ बंधारे बांधले असून, अशा प्रकारे एकाच दिवशी बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविणारी कुडाळ पंचायत समिती ही राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरणार आहे.