Milk Supply : कराडमध्ये दूध रस्त्यावर न ओतता अनोख्या पद्धतीने आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 16:49 IST2018-07-16T16:27:13+5:302018-07-16T16:49:15+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार (१६ जुलै) पासून पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनास कराड तालुक्यातही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीचे ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार (१६ जुलै) पासून पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनास कराड तालुक्यातही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास दुग्धाभिषेक करून आंदोलनाला अनोख्या पद्धतीने सुरुवात केली.