Next

चिपळूणमध्ये भिडे गुरुजींच्या बैठकीला तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:16 IST2018-08-22T19:12:39+5:302018-08-22T19:16:51+5:30

शिवप्रतिष्ठानच्या एका बैठकीसाठी आज बुधवारी चिपळुणात आलेल्या संभाजी भिडे गुरुजींना संभाजी ब्रिगेडसह १४ संघटनांनी विरोध केला.

रत्नागिरी - शिवप्रतिष्ठानच्या एका बैठकीसाठी आज बुधवारी चिपळुणात आलेल्या संभाजी भिडे गुरुजींना संभाजी ब्रिगेडसह १४ संघटनांनी विरोध केला. ही बैठक होऊ नये यासाठी हे सर्वजण बैठकीच्या सभागृहाबाहेर पोहोचलेही. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडवल्याने अनर्थ टळला. त्यानंतरही ही बैठक होऊ नये यासाठी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ही बैठक बंदिस्त सभागृहात होत असल्याने परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे बैठक सुरु आहे तर दुसरीकडे घोषणाजी सुरू आहे.