ओखी चक्री वादळाचा कोकण किनारपट्टीवरही परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 17:07 IST2017-12-04T17:06:12+5:302017-12-04T17:07:25+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ 6 किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत असले, तरी त्याची तीव्रता ...
अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ 6 किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत असले, तरी त्याची तीव्रता कमी होत आहे. मात्र असे असले तरीही कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम जाणवू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. यामुळे किनारपट्टी भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.