पोलीस शिपाई होण्यासाठी तरुण निघाले मुंबईला पळत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 17:58 IST2019-02-07T17:44:10+5:302019-02-07T17:58:56+5:30
पुणे : पोलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या ...
पुणे : पोलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आज नदीपात्रातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकरांमधील काही तरुण हे आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन मुंबईला पळत निघाले आहेत. 11 फेब्रुवारी रोजी ते मुंबईतील आझाद मैदान येथे पोहचणार आहेत.