पावसामुळे बुधवारी मध्यरात्री पुण्यात काय चित्र होतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 13:10 IST2019-09-26T13:10:25+5:302019-09-26T13:10:35+5:30
रात्री आठ वाजता सुरु झालेल्या पावसाने शहरात हाहाकार माजवला आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते जलमय ...
रात्री आठ वाजता सुरु झालेल्या पावसाने शहरात हाहाकार माजवला आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. रस्त्यावरच्या पाण्यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या असून नागरिक आता जीव मुठीत धरुन घराची वाट पकडत आहेत.