Next

सुपुत्र अभिजित वैद्य यांनी दिला भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 12:07 AM2018-04-03T00:07:24+5:302018-04-03T00:07:24+5:30

पुणे - मी भाईंचा मुलगा, त्यांच्यावर उपचार करणारा डॉक्टर आणि त्यांच्या विचारांवर नम्रपणे चालणारा शिष्यदेखील आहे.आरोग्यसेनेची स्थापना करताना आयुष्यात त्यांनी कधीही विचारांशी प्रतारणा केली नाही.अत्यंत उंच,विश्वाचा आवाका असणारा खंदा नेता होता. मी त्यांना भारतातल्या आधुनिक लोकशाही समाजवादाचे भीष्माचार्य म्हणेन.शेवटपर्यंत या देशात समाजवादावर आधारित राजकीय व्यवस्था निर्माण व्हावी असा त्यांचा ध्यास होता. म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की  त्यांच्या जाण्याची पोकळी भरून निघणार नाही.पण त्यांनी जातीयवाद,विषमता,भांडवलशाही   यांच्याविरोधात लढण्यासाठी इतके इंधन दिले आहे की त्यांच्या जाण्याने हे धगधगत अग्निकुंड शारीरिकदृष्टया शमल असलं तरी त्यांचा विचार आम्ही सर्व कार्यकर्ते निश्चितपणे पुढे नेऊ आणि त्यांच्या विचारांवर चालू. (व्हिडीओ - नेहा सराफ)