Next

मी माझा बालमित्र गमवला - बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 00:14 IST2018-04-03T00:13:53+5:302018-04-03T00:14:45+5:30

पुणे - भाई वैद्य यांच्या जाण्याने मी माझा बालमित्र गमवला आहे.लोकशाही, समाजवादी चळवळीचा मार्गदर्शक नेता आपण गमावला आहे.महापौर असताना ...

पुणे - भाई वैद्य यांच्या जाण्याने मी माझा बालमित्र गमवला आहे.लोकशाही, समाजवादी चळवळीचा मार्गदर्शक नेता आपण गमावला आहे.महापौर असताना त्यांना झालेली अटक,गोव्याच्या आंदोलनात फडवलेला झेंडा, त्यांचा ध्यास होता की देशाच्या राजकारणात लोकशाही समाजवादी सत्याग्रही पर्याय होती. आमची कुटुंबमैत्री होती. तो मंत्री झाल्यावर पहिल्यांदा त्याने महिनाभर माझ्या आईला मुंबईला नेलं होत. आघाड्या परिवर्तनवादी कशा होतील असा प्रयत्न असणारा तो एक खंदा व्यक्ती होता.छत्रपती शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांचा तो खरा अनुयायी होता .देशातील लोकशाही समाजवादी चळवळीचे नुकसान झाले आहे, असे बाबा आढाव म्हणाले.( व्हिडिओ - नेहा सराफ)