Next

पावसाळ्यात चेहऱ्यावर वाफ का घ्यावी? Benefits of Taking Face Steam During Monsoon | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:03 PM2021-07-28T15:03:33+5:302021-07-28T15:03:58+5:30

पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. या दिवसात केवळ चेहरा धुतल्याने काहीही होत नाही. हवेमध्ये सतत दमटपणा असतो त्यामुळे आपल्या त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सतत दमटपणा असल्याने चेहऱ्यावर तेल दाटण्याची आणि त्यामुळे मुरूमं येण्याची शक्यताही असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात त्वचेला इन्फेक्शनमुक्त ठेवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी वाफ घेणं आवश्यक आहे. चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी आणि चेहरा चमकदार करण्यासाठी फेस स्टीम म्हणजेच चेहऱ्यावर वाफ घेणे खूप महत्वाचे आहे. आपण आठवड्यातून एकदा फेस स्टीम घेतली तर आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात... तुमच्या चेहऱ्यावर मुरुम, सुरकुत्या किंवा ब्लॅकहेड्सची समस्या असल्यास आठवड्यातून एकदा स्टीम घ्यायलाच पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात वाफ घेण्याचे फायदे-