Next

व्यायाम न करणाऱ्यांमध्ये कोरोनाचा धोका अधिक | Coronavirus and Exercise | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:54 AM2021-05-06T10:54:01+5:302021-05-06T10:54:53+5:30

कोरोना टाळण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती बळकट करणे महत्वाचे आहे आणि यासाठी निरोगी आणि संतुलित आहारासह व्यायाम देखील आवश्यक आहे. व्यायाम न करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असतो असं एका नवीन research मध्ये सांगण्यात आलंय... एका नवीन संशोधनानुसार, जे लोक व्यायाम करीत नाहीत, मग ते आळशीपणामुळे किंवा वेळेअभावी असो, ज्यांना संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी बसणे आवश्यक आहे, अशा लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यूची शक्यता अधिक असते. नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे सूचित केले गेले आहे की कोविड -19चा परिणाम व्यायाम न करणाऱ्यांसाठी धोकादायक परिणाम होतो. हा अभ्यास British Journal of Sports Medicine ने केलाय.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यायोगहेल्थ टिप्सcorona virusYogaHealth Tips